Delhi Elections: अजित पवारांनी अरविंद केजरीवालांविरोधात उतरवला उमेदवार! 30 उमेदवारांच्या नावाची केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 16:55 IST2025-01-17T16:54:07+5:302025-01-17T16:55:08+5:30

NCP Candidates list for Delhi Assembly Election 2025: एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्लीत विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत न जातात स्वबळाचा नारा दिला आहे. 

Delhi Elections: Ajit Pawar fields candidate against Arvind Kejriwal! Names of 30 candidates announced | Delhi Elections: अजित पवारांनी अरविंद केजरीवालांविरोधात उतरवला उमेदवार! 30 उमेदवारांच्या नावाची केली घोषणा

Delhi Elections: अजित पवारांनी अरविंद केजरीवालांविरोधात उतरवला उमेदवार! 30 उमेदवारांच्या नावाची केली घोषणा

NCP Candidates For Delhi Elections 2025: एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकटा चलो चा नारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीसाठी ३० उमेदवार जाहीर केले आहेत.  माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल निवडणूक लढवत असलेल्या मतदारसंघातही अजित पवारांनी आपला उमेदवार उतरवला आहे. (Ajit Pawar's NCP releases a list of 30 candidates for the upcoming)

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दिल्ली विधानसभा निवडणुकीत एनडीएचा घटक पक्ष असलेल्या रामदास आठवले यांचा आरपीआय पक्षही स्वबळावर निवडणूक लढवत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आता ३० उमेदवारांची नावे जाहीर केली. 

दिल्ली विधानसभा : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराची यादी

बुरारी विधानसभा मतदारसंघ - रतन त्यागी

बादली विधानसभा मतदारसंघ - मुलायम सिंह

रिठाळा विधानसभा मतदारसंघ - लखन प्रजापती

मंगोल पुरी विधानसभा मतदारसंघ - खेम चंद बसवाल

शालिमार बाग विधानसभा मतदारसंघ - मोहम्मद उस्मान

चांदणी चौक विधानसभा मतदारसंघ - खालीद उर रेहमान

 माटिया महल विधानसभा मतदारसंघ - मोहम्मद जावेद

बल्लीमारन विधानसभा मतदारसंघ - मोहम्मद हारून

मोती नगर विधानसभा मतदारसंघ - सदरे आलम

मदिनापूर विधानसभा मतदारसंघ - हरिश कुमार

हरी नगर विधानसभा मतदारसंघ - शबीर खान

जनकपुरी विधानसभा मतदारसंघ - मोहम्मद नवीन

विलासपुरी विधानसभा मतदारसंघ - हमीद

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ - विश्वनाथ अगरवाल

कस्तुरबा नगर विधानसभा मतदारसंघ - सुरेंद्र सिंह हुड्डा

मालवीय नगर विधानसभा मतदारसंघ - मोहम्मद समीर 

छतारपूर विधानसभा मतदारसंघ - नरेंद्र तन्वर 

देवळी विधानसभा मतदारसंघ - खेम चंद राजोरा

संगम विहार विधानसभा मतदारसंघ - कमर अहमद 

कालकाजी विधानसभा मतदारसंघ - जमील 

तुघलकाबाद विधानसभा मतदारसंघ - प्रेम खताना

बदरपूर विधानसभा मतदारसंघ - इम्रान सैफी

लक्ष्मी नगर विधानसभा मतदारसंघ - नमहा

कृष्णा नगर विधानसभा मतदारसंघ - दानिश अली

शहादरा विधानसभा मतदारसंघ - राजेंद्र पाल

सीमा पुरी विधानसभा मतदारसंघ - राजेश लोहिया

रोहतास नगर विधानसभा मतदारसंघ - अभिषेक 

घोंडा विधानसभा मतदारसंघ - मेहक डोग्रा

गोकळपूर विधानसभा मतदारसंघ - जगदीश भगत

करवाल नगर विधानसभा मतदारसंघ - संजय मिश्रा

अरविंद केजरीवाल, अतिशी यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी?

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान मुख्यमंत्री अतिशी आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या दोघांविरोधातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. 

अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, तर मुख्यमंत्री अतिशी या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने केजरीवालांविरोधात विश्वनाथ अगरवाल यांना, तर अतिशी यांच्याविरोधात जमील यांना उमेदवारी दिली आहे. 

Web Title: Delhi Elections: Ajit Pawar fields candidate against Arvind Kejriwal! Names of 30 candidates announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.