आरोपीने स्वतःच्या घरात लाटण्याने ठेचून केली तरुणाची हत्या; मृतदेहाची ओळख पटवणे कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 19:45 IST2024-11-21T19:45:34+5:302024-11-21T19:45:43+5:30

दिल्लीत आरोपीने त्याच्याच घरात एका तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

Delhi Crime Young man was killed by attacking him with rolling pin and knife in his house | आरोपीने स्वतःच्या घरात लाटण्याने ठेचून केली तरुणाची हत्या; मृतदेहाची ओळख पटवणे कठीण

आरोपीने स्वतःच्या घरात लाटण्याने ठेचून केली तरुणाची हत्या; मृतदेहाची ओळख पटवणे कठीण

Delhi Crime : दिल्लीतल्या छावला परिसरात किरकोळ बाचाबाचीवरुन एका व्यक्तीने तरुणावर लाटणं आणि चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा सगळा प्रकार घडला त्यावेळी दोघेही आरोपीच्या घरी हजर होते. तरुणाचा आरडाओरडा ऐकू आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले तेव्हा त्यांना हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात सापडला. तसेच आरोपीच्या घराचा दरवाजा देखील तुटलेल्या अवस्थेत होता.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी चौकशी केली असता, स्थानिक लोकांनी मिळून दरवाजा तोडल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने तरुणाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले. यानंतर, क्राईम टीम व्यतिरिक्त, स्थानिक पोलिसांनी देखील फॉरेन्सिक टीमला माहिती दिली आणि त्यांना घटनास्थळी बोलावले. दोन्ही पथकांनी घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा केले आहेत.

पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी शिवराम याला अटक केली आहे. तर मृताचे वय अंदाजे ३० वर्षे असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केल्यापासून आरोपी दारूच्या नशेत होता. नशेत त्याने भरपूर मद्यपान करून हा गुन्हा केल्याचे दिसत असल्याचे पोलिसांनी म्हटलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराम हा आपल्या कुटुंबासह छावला परिसरात भाड्याच्या घरात राहतो. त्याची पत्नी घरात साफसफाईचे काम करते. बुधवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास एका तरुणाचा घरातच खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहिले की, जवळच्या लोकांनी खोलीचा दरवाजा तोडला होता. खोलीत एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. तर आरोपी तरुणाजवळ बसला होता.

पोलिसांनी जखमी तरुणाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी मृतकाबाबत शेजाऱ्यांकडे चौकशी केली, मात्र कोणतीही माहिती मिळाली नाही. घटनेच्या वेळी आरोपीची पत्नी कामावर गेली होती, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मुलं बाहेर खेळत असताना आरोपी शिवरामने तरुणावर लाटणं आणि चाकूने हल्ला केला. सध्या पोलीस मृताची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Web Title: Delhi Crime Young man was killed by attacking him with rolling pin and knife in his house