‘मी माझ्या आई, बहीण, भावाला ठार मारलंय’, तिघांचा खून करून पोलीस ठाण्यात आला तरुण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 19:21 IST2026-01-05T19:21:43+5:302026-01-05T19:21:48+5:30
Delhi Crime News:

‘मी माझ्या आई, बहीण, भावाला ठार मारलंय’, तिघांचा खून करून पोलीस ठाण्यात आला तरुण
एका तरुणाने आपल्याच जन्मदात्या आईसोबत भाऊ आणि बहीण अशी तिघांची क्रूरपणे हत्या करून नंतर पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पणक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना दिल्लीतील लक्ष्मीनगर परिसरात घडली असून, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलीस ठाण्यात आलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, पुढील तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना लक्ष्मीनगर परिसरात घडली आहे. येथे आरोपी तरुणीने त्याच्या आईसह, बहीण आणि भावाची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच स्थानिकांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली.
हत्या केल्यानंतर आरोपी थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. तसेच त्याने स्वत:ला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. सध्या आरोपीने एवढं भयंकर कृत्य का केलं याचा आता शोध घेत आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमित तपासामध्ये हत्या झालेले तिघेही आरोपीचे जवळचे नातेवाईक होते, हे स्पष्ट झालं आहे. तसेच मृतांमध्ये आरोपीची आई, भाऊ आणि बहिणीचा समावेश असल्याचे समोर आले आहे. आता पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतले असून, ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पुढील तपास सुरू आहे.