३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 18:41 IST2025-09-27T18:37:11+5:302025-09-27T18:41:55+5:30

दिल्लीत सरकारी अधिकाऱ्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या महिलेला कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला.

Delhi BMW Case Gaganpreet granted bail by Patiala House Court to pay a bond of Rs 1 lakh | ३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

Delhi BMW Case:दिल्लीतील बीएमडब्ल्यू अपघात प्रकरणातील आरोपी गगनप्रीतला पटियाला हाऊस न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने आणखी दोन जामीनदारांच्या अधीन राहून एक लाखांच्या हमीवर जामीन मंजूर केला. आरोपीने जामीन अर्जात आरोग्य आणि कौटुंबिक परिस्थितीचा उल्लेख केल्यानंतर न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामिनावर काही अटी घालण्यात आल्या होत्या, ज्यात त्याचा पासपोर्ट जमा करणे आणि प्रत्येक सुनावणीला न्यायालयात उपस्थित राहणे हे समाविष्ट होते.

१४ सप्टेंबर रोजी दिल्लीतील धौला कुआंजवळ झालेल्या बीएमडब्ल्यू अपघातातील आरोपी गगनप्रीत कौरला पटियाला हाऊस न्यायालयाने जामीन मंजूर केला. जामीन मंजूर करताना न्यायालयाने अपघातानंतर घटनास्थळी आलेल्या रुग्णवाहिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "अपघातानंतर ३० सेकंदांसाठी एक रुग्णवाहिका घटनास्थळी उपस्थित होती आणि ती जवळच्या रुग्णालयात जात होती. तरीही, ती जखमींना घेऊन गेली नाही. हा निष्काळजीपणा नाही का? काही सेकंदातच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि ३० सेकंदांसाठी तिथेच थांबली. पण जखमींना रुग्णालयात नेण्यात आले नाही. त्या रुग्णवाहिकेला कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नसतानाही, ती जवळच्या आर्मी बेस रुग्णालयात जात होती," असं न्यायालयाने म्हटलं.

त्या रुग्णवाहिकेचे काय करायचं? निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू झाल्याबद्दल ते दोषी नाहीत का? असं असं न्यायालयाने पोलिसांना विचारलं. न्यायालयाने म्हटले की, रुग्णवाहिकेत जखमींना रुग्णालयात नेणे बंधनकारक होते. नर्सने जवळच्या लोकांना विचारले की कोणाला मदत हवी आहे का, तरीही ती ३० सेकंदांच्या आत घटनास्थळावरून निघून गेली. हा वैद्यकीय निष्काळजीपणा नाही का? असा सवाल न्यायालयाने केला.

अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी नवज्योत सिंग यांच्या दुचाकीला धडक देणाऱ्या बीएमडब्ल्यू कारला ३८ वर्षीय गगनप्रीत कौर चालवत असल्याचा आरोप आहे. या घटनेत सिंग यांचा मृत्यू झाला आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाल्या. ही घटना रविवारी, १४ सप्टेंबर रोजी घडली जेव्हा नवज्योत सिंग आणि त्यांची पत्नी संदीप बांगला साहिब गुरुद्वाराहून परतत होते.

दरम्यान, पटियाला हाऊस कोर्टात आरोपी महिला गगनप्रीतच्या जामीन अर्जावर विचार करताना न्यायालयाने घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज देखील पाहिले. या दरम्यान, दिल्ली पोलिसांनी युक्तिवाद केला की न्यू लाईफ नर्सिंग होम गंभीर आजार आणि अपघातांनी ग्रस्त असलेल्यांना त्वरित आणि योग्य उपचार देत नाही आणि अपघातस्थळाजवळ अनेक विशेष रुग्णालये होती, पण जखमींना तिथे नेण्यात आले नाही.

यावर गगनप्रीतच्या वकिलाने सांगितले की, "गगनप्रीतने तिच्या जखमी पतीला सोडून दिले आणि नवज्योत सिंग यांना ताबडतोब रुग्णालयात नेले. जर जखमींना मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर असे आरोप लावले गेले तर कोणीही मदत करण्याचे धाडस करणार नाही. पीसीआरलाही फोन करण्यात आला आणि कॉल रेकॉर्ड पोलिसांना देण्यात आले. गगनप्रीतने सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पूर्णपणे पालन केले."

Web Title : दिल्ली बीएमडब्ल्यू मामला: आरोपी को जमानत, अदालत ने एम्बुलेंस की लापरवाही पर सवाल उठाया।

Web Summary : दिल्ली बीएमडब्ल्यू दुर्घटना मामले में आरोपी गगनप्रीत कौर को पटियाला हाउस कोर्ट ने जमानत दी। अदालत ने सवाल उठाया कि घटनास्थल पर 30 सेकंड के लिए मौजूद एम्बुलेंस ने घायलों को क्यों नहीं पहुंचाया, जिससे चिकित्सा लापरवाही की चिंता बढ़ गई। दुर्घटना में पीड़ित की मौत हो गई।

Web Title : Delhi BMW case: Accused granted bail; court questions ambulance's negligence.

Web Summary : Gaganpreet Kaur, accused in the Delhi BMW accident case, received bail from Patiala House Court. The court questioned why an ambulance present at the scene for 30 seconds didn't transport the injured, raising concerns about medical negligence. The victim died in the accident.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.