डॉ. मुझम्मिलला सोमवारी दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली फरीदाबाद येथे अटक करण्यात आली. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी फरीदाबाद येथे तपासादरम्यान ३६० किलो अमोनियम नायट्रेट, असॉल्ट रायफल्स आणि इतर दारूगोळा जप्त केला. मुझम्मिलची आई नसीमा यांनी मंगळवारी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "तो जवळपास चार वर्षांपूर्वीच घरातून निघून गेला होता. तो दिल्लीत डॉक्टर म्हणून काम करत होता."
"आम्हाला त्या काळात त्याच्याबद्दल कोणतीही माहिती नव्हती. जेव्हा त्याला अटक करण्यात आली तेव्हा आम्हाला इतरांकडून त्याच्याबद्दल माहिती मिळाली. आम्ही त्याला भेटण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी आम्हाला परवानगी दिली नाही. दुसऱ्या मुलालाही अटक करण्यात आली आहे. ते म्हणत आहेत की माझा मुलगा दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित आहे. मला याची काहीच माहिती नाही. माझ्या दोन्ही मुलांना सोडून द्यावं असं मला वाटत आहे."
मुझम्मिलचा भाऊ आझाद शकील यानेही एएनआयशी संवाद साधला. भावाबद्दल तो म्हणाला, "त्याच्याकडून काही साहित्य जप्त करण्यात आल्याचे आरोप केले जात आहेत. तो गेल्या तीन वर्षांपासून दिल्लीत डॉक्टर आहे. आम्हाला त्याला भेटू दिलं जात नाही. तो दरवर्षी दोनदा घरी येत असे. तो अविवाहित आहे. गेल्या ५० वर्षांत आमच्या कुटुंबावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. माझा भाऊ एक चांगला मुलगा होता."
"आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २,९०० किलोग्रॅम स्फोटक पदार्थात अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फरचा समावेश आहे. यामध्ये फरीदाबादमधील घनीच्या भाड्याच्या घरात जप्त केलेल्या ३६० किलोग्रॅम ज्वलनशील पदार्थाचा समावेश आहे. ही स्फोटक सामग्री अमोनियम नायट्रेट असल्याचा संशय आहे. अटक केलेल्या आठपैकी सात जण काश्मीरचे आहेत.
Web Summary : The mother of Dr. Muzzammil, arrested in Faridabad on terrorism charges, stated he left home four years ago and worked as a doctor in Delhi. She pleads for his release, claiming ignorance of the allegations.
Web Summary : आतंकवाद के आरोप में फरीदाबाद में गिरफ्तार डॉ. मुजम्मिल की मां ने कहा कि वह चार साल पहले घर छोड़ गया था और दिल्ली में डॉक्टर के रूप में काम कर रहा था। उन्होंने उसकी रिहाई की गुहार लगाई, आरोपों से अनभिज्ञता जताई।