Jyoti Malhotra : ज्योतीने मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर; पोलिसांना मिळाले अनेक महत्त्वाचे पुरावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:41 IST2025-05-27T15:40:55+5:302025-05-27T15:41:35+5:30
Jyoti Malhotra : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या प्रकरणात पोलीस वेगाने तपास करत आहेत.

Jyoti Malhotra : ज्योतीने मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर; पोलिसांना मिळाले अनेक महत्त्वाचे पुरावे
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या प्रकरणात पोलीस वेगाने तपास करत आहेत. चौकशीदरम्यान हरियाणा पोलिसांनी तिच्या मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर केला, ज्यामुळे अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाले. फॉरेन्सिक तपासणीनंतर पोलिसांना काही पुरावे सापडले आहेत जे या संपूर्ण प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्यास खूप मदत करू शकतात.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिकव्हर केलेल्या डेटामधून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित पीआयओ (पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्ह) सोबत झालेल्या संभाषणाचे पुरावे समोर आले आहेत. याशिवाय पाकिस्तानशी संबंधित असलेल्या दानिशचं नावही समोर आलं आहे, जो दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात काम करत असल्याचं सांगितलं जात आहे.
पाकिस्तानात फिरताना ज्योतीच्या आजुबाजुला AK-47 घेऊन ६ गनर्स, Video ने उलगडलं रहस्य
पोलिसांनी ज्योती मल्होत्राकडून तीन मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त केला, जे डिजिटल फॉरेन्सिक तपासणीसाठी कर्नालमधील मधुबन येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा आणि कॉल डिटेल्स परत मिळाले आहेत, परंतु लॅपटॉपमधील डेटा अद्याप प्रलंबित आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की, पाकिस्तानी संपर्कांसह मोबाईलमध्ये कॉल, व्हॉट्सएप चॅट आणि काही व्हिडीओ ट्रान्सफर करण्यात आले आहेत.
"पप्पा, टेन्शन घेऊ नका, वकील पाहू नका, मी लवकर बाहेर येईन"; ज्योती मल्होत्राची वडिलांशी भेट
ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
हे प्रकरण फक्त हरियाणा पोलिसांपुरते मर्यादित नाही. आतापर्यंत राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील पोलीस पथकं हिसारला पोहोचली आहेत आणि ज्योतीची चौकशी केली आहे. ज्योतीने तिच्या यूट्यूब चॅनलवर ज्या ठिकाणांचे व्हिडीओ अपलोड केले होते त्या सर्व ठिकाणांची माहिती गोवा आणि यूपी पोलिसांनी घेतली आहे. तिने व्हिडीओ का शूट केला, ते कोणाला पाठवले आणि त्यामागचा उद्देश काय होता याता तपास केला जात आहे.