Decisions in the meeting of the Ministry of Manpower Development and UGC, from the academic year November of the colleges | महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून, मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीच्या बैठकीत निर्णय

महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून, मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीच्या बैठकीत निर्णय

नवी दिल्ली : विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरपासून सुरू करावे, असा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालय व युजीसीच्या बैठकीत मंगळवारी रात्री उशिरा घेण्यात आला.

मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक झाली. दरम्यान, दिल्ली विद्यापीठामध्ये ओपन बुक परीक्षा १५ आॅगस्टनंतरच होणार आहे. तसेच विद्यापीठांमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा पूर्ण करून आॅक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर करावेत, अशी अपेक्षा आहे. त्यानुसार सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधून नोव्हेंबरमध्ये शैक्षणिक सत्र सुरू होईल, असेही बैठकीत सांगण्यात आले.
विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया दीर्घकाळ...
जेईई-नीट परीक्षांचे निकाल लागेपर्यंत विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी, असा निर्णयही मनुष्यबळ विकास मंत्री निशंक यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Decisions in the meeting of the Ministry of Manpower Development and UGC, from the academic year November of the colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.