भारताला मिळणार एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टिम; मोदी-पुतिन भेटीमध्ये करारावर शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 15:15 IST2018-10-05T13:08:50+5:302018-10-05T15:15:27+5:30

सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टिम संरक्षण दलाच्या ताफ्यात आणण्याचा भारताचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

Deal for five Russian S-400 Triumf missile shield systems has been signed by India | भारताला मिळणार एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टिम; मोदी-पुतिन भेटीमध्ये करारावर शिक्कामोर्तब

भारताला मिळणार एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टिम; मोदी-पुतिन भेटीमध्ये करारावर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली - सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टिम संरक्षण दलाच्या ताफ्यात आणण्याचा भारताचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. निर्बंध लादण्याची अमेरिकेने दिलेली धमकी आणि इतर अडथळे धुडकावून लावत भारत आणि रशियामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्यात आज झालेल्या चर्चेनंतर या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच दोनी देशांच्या नेत्यांच्या उपस्थितीत या ऐतिहासिक करारावर सह्या झाल्या आहे.  

भारत भेटीवर आलेले रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज हैदराबाद हाऊस येथे भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेमधून संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रासंबंधीचे महत्त्वपूर्ण करार मार्गी लागले आहेत.




काय आहे एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली ?

एस-400 ही जगातील अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली असून, या प्रणालीमध्ये शत्रूची विमानांना अचूकरीत्या लक्ष्य करण्याचं सामर्थ्य आहे.  एस-400 ला रशियाची अत्याधुनिक लांब पल्ल्याती जमिनीवरून हवेत मारा करणारी मिसाईल डिफेन्स सिस्टीम मानले जाते. ही प्रणाली शत्रूची क्रूझ, विमाने आणि बॅलेस्टिक मिसाईल टिपण्यात सक्षम आहे.  ही प्रणाली रशियाच्याच एस-300 प्रणालीचे आधुनिक रुप आहे. 
अल्माज आंटे या शास्त्रज्ञाने ही प्रणाली विकसित केली होती. तसेच 2007 पासून एस 400 मिसाईल डिफेन्स सिस्टीम रशियाच्या सेवेत आहे. एकाच वेळी 36 वार करण्याची क्षमता हे या प्रणालीचे वैशिष्ट्य आहे.  


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन यांच्या भेटीमध्ये संरक्षणाबरोबरच अंतराळ सहकार्यासाठीही महत्त्वपूर्ण करार झाला आहे. या करारांतर्गत भारताला सैबेरियामधील नोवन्होसिबिर्स्क शहराजवळ निरीक्षण केंद्र उभारण्याची परवानगी रशियाने दिली आहे. 



 

 

Web Title: Deal for five Russian S-400 Triumf missile shield systems has been signed by India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.