धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:31 IST2025-10-08T11:00:52+5:302025-10-08T11:31:06+5:30
राजस्थानमध्ये विकल्या जाणाऱ्या बनावट औषधांवरून लोकांच्या आरोग्याशी किती तडजोड केली जात आहे हे लक्षात येते. या औषधांवर बंदी घालण्यात आली तोपर्यंत हजारो गोळ्या विकल्या होत्या.

धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
काही दिवसापूर्वी 'कफ सिरप'मुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता आणखी एक गंभीर आरोग्य निष्काळजीपणा समोर आला आहे. एकट्या राजस्थानमध्ये, एका वर्षाच्या आत अनेक मोठ्या आजारांसाठीच्या औषधांचे नमुने सदोष असल्याचे आढळून आले. यापैकी हजारो गोळ्या आधीच विकल्या आहेत. फेल नमुन्यांमध्ये अँटीबायोटिक्सपासून ते हृदयविकाराच्या झटक्यांसह गंभीर आजारांसाठीच्या गोळ्यांचा समावेश आहे. ही औषधे मोठ्या प्रमाणात वापरली जातात. तसेच अनेक औषधांमध्ये साल्ट देखील नसल्याचे आढळून आले.
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
या व्यवसायाचा फायदा घेण्यासाठी औषध नियंत्रण कायद्यात अनेक त्रुटी आहेत, याचा गैरवापर केला जात आहे. राजस्थान औषध नियंत्रण विभागाच्या तपासणीदरम्यान औषधांचे नमुने फेल झाल्याचे प्रकरण समोर आले. राजस्थान औषध नियंत्रण विभागाच्या मते, शेकडो औषधांचे नमुने फेल ठरले आहेत.
या औषधांचे नमुने फेल झाले
अँटीबायोटिक्स- अमोक्सिसिलिन, क्लॅव्हुलेनिक अॅसिड टॅब्लेट, सिप्रोफ्लोक्सासिन, सेफपोडॉक्साईम आणि सेफ्ट्रियाक्सोन इंजेक्शन्सच्या सहा बॅचेस चाचणीत अपयशी ठरल्या. मेडिरिच लिमिटेडने चाचणीपूर्वी औषधांचे 100,000 पेक्षा जास्त डोस विकले होते.
स्टिरॉइड- बीटामेथासोनच्या ३ बॅचेस निष्क्रिय आढळल्या. ५ डिसेंबर रोजी अहवाल आला. तोपर्यंत मेडीवेल बायोटिकची ३० हजार औषधे विकली होती.
अँटीअॅलर्जिक- लेव्होसेटीरिझिन, मॉन्टेलुकास्टच्या ४ बॅचेस नमुन्यात निष्क्रिय आढळल्या. ५ डिसेंबर रोजी त्याचा अहवाल आला. पण तोपर्यंत थेराविन फॉर्म्युलेशनची ३५ हजार औषधे विकली गेली होती.
अँटीडायबेटिक- ग्लिमेपिराइड, पायोग्लिटाझोनच्या ३ बॅचेस निष्क्रिय. रिलीफ बायोटेकची १८ हजारांहून अधिक औषधे विकली गेली. याशिवाय, वेदनाशामक औषधांच्या ३ बॅचेस- एसिक्लोफेनाक, पॅरासिटामॉल निकामी आढळल्या. ११ डिसेंबर रोजी त्याचा अहवाल आला. पण तोपर्यंत २० हजार औषधे विकली होती.
नमुन्यांमध्ये गॅस आणि कॅल्शियमसाठीची औषधे देखील फेल
कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी3 सप्लिमेंट्सच्या 8 बॅचेसचे नमुने देखील फेल झाली आहेत. तर पोटातील गॅससाठी पीपीआयच्या 3 बॅचेस फेल झाल्या आहेत. यातील अनेक हजार गोळ्या देखील विकल्या आहेत. दरम्यान, हृदयरोगात वापरल्या जाणाऱ्या लोसार्टनच्या 2 बॅचेस फेल ठरल्या आहेत. हे औषध बनवणाऱ्या अमेक्स फार्माच्या 10 हजारांहून अधिक गोळ्या विकल्या आहेत.