शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

भयंकर! मध्य प्रदेशच्या नदीत तरंगताना दिसले मृतदेह; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, गावात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 11:00 AM

Dead Bodies Found Floating In Ken River : नदीत अनेक मृतदेह तरंगताना आढळून आले आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,37,03,665 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,58,317 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बिहारमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या मृतदेहांची चक्क नद्यांमध्ये विल्हेवाट लावण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बक्सर येथे गंगा नदीत अनेक कोरोनाग्रस्तांचे मृतदेह आढळले आहेत. तर कटीहार येथेही कटीहार नदीत काही मृतदेह आढळले आहेत. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून स्थान‍िक प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. यानंतर आता मध्य प्रदेशमध्ये देखील अशीच धक्कादायक घटना घडली आहे. 

मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यातील नदीत अनेक मृतदेह तरंगताना आढळून आले आहेत. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदापूर गावातील मुळची केन नदीची उपनदी असलेल्या रूंझ नदीत काही मृतदेह तरंगताना दिसत आहेत. हे मृतदेह कोरोनाग्रस्तांचे आहेत की नाही याबाबत माहिती नाही. मात्र आम्ही गावातील मुलांना नदीत वाहणारे मृतदेह बाहेर काढण्यास मनाई केली आहे. कारण यामुळे गावात कोरोनाचा प्रसार होऊ शकतो अशी आम्हाला भीती असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. तसेच गावातील लोक यांच नदीचं पाणी हे पिण्यासाठी वापरतात. 

नदीची स्वच्छता करण्याची मागणी

नदीत अशाप्रकारे मृतदेह वाहून येत असल्याने पिण्यासाठी आता नेमकं कोणतं पाणी वापरायचं असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. तसेच प्रशासनाने तातडीने या नदीची स्वच्छता करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे पन्ना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय कुमार मिश्रा यांनी यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. तसेच नदीत फक्त दोन मृतदेह आढळल्याचं म्हटलं आहे. हे कॅन्सरग्रस्तांचे मृतदेह असून शेजारील गावातील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मृतदेह पारंपारिक विधीचा भाग म्हणून नदीत सोडण्यात आले असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बक्सर जिल्ह्यातील चौसा येथील महादेव घाटावर अनेक मृतदेह तरंगतांना आढळले. चौसा येथील घाटावर दररोज 100 ते 200 मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जातात. मात्र, सरणासाठी लाकूड अपुरे पडते. त्यामुळे गंगा नदीतच मृतदेह फेकण्यात येतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.  बिहारमध्येच दोन डझनांहून अधिक रुग्णवाहिका धूळ खात पडल्याचे उघडकीस आले होते. भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या खासदार निधीतून या रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आली होती. कटीहारमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहांची नदीत विल्हेवाट लावण्याचा प्रकार एका व्हिडिओद्वारे उघडकीस आला आहे. रुग्णवाहिकेतून कोरोनाग्रस्तांचे मृतदेह नदीत फेकण्यात येत असल्याचे त्यात दिसत आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशriverनदीIndiaभारतDeathमृत्यू