दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू? जाणून घ्या काय आहे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 06:29 IST2020-06-07T06:27:42+5:302020-06-07T06:29:42+5:30

अधिकृत दुजोरा नाही, भावाने केला इन्कार

David Ibrahim dies of corona? Know what is true | दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू? जाणून घ्या काय आहे सत्य

दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू? जाणून घ्या काय आहे सत्य

इस्लामाबाद : मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेमागचा मास्टरमाइंड आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पाकिस्तानात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चर्चा शनिवारी सकाळपासून सुरू आहे. एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. याला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

शनिवारी दाऊदच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर चर्चांना उधाण आले आहे. दाऊदचा भाऊ अनिस याने मात्र दाऊदला कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या वृत्ताला नाकारले आहे. अनिसने दावा केला आहे की, त्याच्या भावासोबत कुटुंबातील सगळे सदस्य स्वस्थ आहेत. कोणालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही. अनिस हाच सध्या डी कंपनी चालवीत आहे.

Web Title: David Ibrahim dies of corona? Know what is true