शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चव्हाणांच्या निवडीबद्दल दर्डा यांनी मानले सोनियांचे आभार

By admin | Updated: March 5, 2015 02:25 IST

खासदार अशोक चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत.

नवी दिल्ली : खासदार अशोक चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल राज्यसभेचे खासदार विजय दर्डा यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले आहेत. खा. विजय दर्डा यांनी बुधवारी येथे सोनिया गांधी यांची भेट घेतली व चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी तसेच मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे आभार मानले.राज्यातील पक्ष संघटनेमध्ये योग्य वेळी फेरबदल केला आहे व यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल. काँग्रेस पक्ष कमजोर झाल्याकारणाने राज्यात एकापाठोपाठ एक अशा निवडणुकांमध्ये पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे हा खांदेपालट करण्याची नितांत आवश्यकता होती, असे विजय दर्डा यांनी म्हटले आहे.माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर ही जबाबदारी सांभाळण्यासाठी अशोक चव्हाण हे सर्वांत सक्षम व योग्य नेते आहेत. चव्हाण यांची निवड अगदी यथोचित आणि उपयुक्त अशीच आहे, असेही विजय दर्डा म्हणाले.विजय दर्डा यांनी निरुपम यांच्या नियुक्तीचे तसेच नेत्यांच्या युवा चमूला पुढे आणण्याच्या निर्णयाचेही स्वागत केले आहे. तथापि, महाराष्ट्राच्या राजधानीत काँग्रेसला एकजूट होऊन लढा देता यावा यासाठी मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे मावळते अध्यक्ष जनार्दन चांदूरकर आणि अन्य नेत्यांचा या नव्या चमूत समावेश करण्यात यावा, अशी सूचनाही विजय दर्डा यांनी केली आहे. (प्रतिनिधी)