शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 15:53 IST

पाकिस्तान दूतावासात तैनात असलेल्या एहसान-उर-रहमान उर्फ ​​दानिशबाबत मोठा खुलासा झाला आहे.

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचेपाकिस्तान दूतावासात काम करणाऱ्या पाकिस्तानी दानिशशी संबंध असल्याचे समोर आले होते. आता त्याच डॅनिशबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. एहसान-उर-रहमान उर्फ ​​दानिश हा पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI एजंट असल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, दानिश इस्लामाबादमध्ये आयएसआय कार्यालयात तैनात होता. दानिशचा पासपोर्ट इस्लामाबादमधूनच जारी करण्यात आला होता.

​​21 जानेवारी 2022 रोजी दानिशचा भारतासाठी व्हिसा जारी करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आयएसआय दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात आपल्या एजंटांना तैनात करुन भारतीयांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम करायची. ज्यांना पाकिस्तानी व्हिसा हवाय, त्यांच्याशी मैत्री करणे, ब्लॅकमेल करणे, हनी ट्रॅपमध्ये अडकवणे, पैशाचे आमिष दाखवणे...अशा विविध मार्गांना भारताविरुद्ध हेरगिरी करण्यास भाग पाडले जायचे. 

ज्योती मल्होत्रा ​​दानिशच्या सतत संपर्कात हेरगिरीच्या आरोपाखाली पकडलेल्या ज्योती मल्होत्राने तिच्या कबुलीजबाबात म्हटले आहे की, दानिशच्या सतत संपर्कात होती. चौकशीदरम्यान ज्योती मल्होत्राने सांगितले की, ती 2023  मध्ये पाकिस्तानचा व्हिसा मिळविण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेली होती. तिथे तिची भेट अहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिशशी झाली. दानिशचा मोबाईल नंबर मिळाल्यानंतर ती त्याच्याशी बोलू लागली.

ती दानिशच्या विनंतीवरुन दोनदा पाकिस्तानला गेली होती. दानिशच्या आग्रहामुळेच ती पाकिस्तानात अली हसनला भेटली, त्यानेच ज्योतीच्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली. पाकिस्तानमध्ये अली हसननेच ज्योतीची पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांसोबतची बैठक आयोजित केली होती. तिथेच तिची भेट शकीर आणि राणा शाहबाज यांच्याशीही झाली. सध्या यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत असून, दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. 

 

टॅग्स :Jyoti Malhotraज्योती मल्होत्राIndiaभारतPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूर