तपोवनात धोकेदायक पुलामुळे दुघर्टनेची भीती

By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:44+5:302015-08-03T22:26:44+5:30

नाशिक : महापालिकेने तपोवनात अनेक सुधारणा केल्या असल्या तरी गोदा-कपिला संगमाच्या ठिकाणी तयार करण्यात आलेला पत्र्याचा पूल अत्यंत धोकादायक परिस्थितीत आहे. त्याचे पत्रे केव्हाही पडण्याची आणि त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Dangerous fear of accidents due to a scorching bridge in Tapava | तपोवनात धोकेदायक पुलामुळे दुघर्टनेची भीती

तपोवनात धोकेदायक पुलामुळे दुघर्टनेची भीती

शिक : महापालिकेने तपोवनात अनेक सुधारणा केल्या असल्या तरी गोदा-कपिला संगमाच्या ठिकाणी तयार करण्यात आलेला पत्र्याचा पूल अत्यंत धोकादायक परिस्थितीत आहे. त्याचे पत्रे केव्हाही पडण्याची आणि त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सदरचा पूल त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे. तपोवनातील गोदा-कपिला संगम येथे महापालिकेच्या वतीने गेल्या कुंभमेळ्यात अनेक प्रकारची सुशोभीकरणाची कामे करण्यात आली. त्याच वेळी हे काम करण्यात आले होते. नंतर कुंभमेळा संपल्यानंतर मात्र हळूहळू या भागातील सुशोभीकरणाची रया गेली. पुलाचा तळ निकामी झाल्याने जवळपास हा पूल बंदच होता. महापालिकेने अधून-मधून या पुलाकडे लक्ष पुरविले. मात्र नंतर त्याची अवस्था बिकट झाली आता, या पुलाला लोखंडी पत्रे ठोकून तो सुरू करण्यात आला असला तरी तो अत्यंत धोकादायक असून, पूल तुटल्यास गंभीर दुर्घटना होऊ शकते. कुंभमेळ्यात या ठिकाणी गर्दी होणार आहे, अशा वेळी पूल तुटल्यास जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे हा पूल त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी अध्यक्ष करण गायकर, प्रदेश महासचिव विजय वावळे, शिवा तेलंग, संतोष माळोदे, श्याम फर्नांडीस यांनी केली आहे.
छायाचित्र स्कॅनींग-
तपोवनातील हाच तो धोकादायक पूल.

Web Title: Dangerous fear of accidents due to a scorching bridge in Tapava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.