शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन कुंटणखान्यांवर धाडी

By admin | Updated: February 21, 2015 00:50 IST

तीन दलालांना अटक : तीन तरुणींची रवानगी सुधारगृहात

तीन दलालांना अटक : तीन तरुणींची रवानगी सुधारगृहात
नागपूर : देहव्यवसाय सुरू असलेल्या शहरातील दोन पॉश कुंटणखान्यावर सामाजिक सुरक्षा पथकाने धाड टाकून तीन दलालांना अटक केली आहे तर तीन तरुणींची या व्यवसायातून सुटका करून, त्यांची महिला सुधार गृहात रवानगी करण्यात आली. हा देहव्यापार अनेक दिवसांपासून सुरु होता, अशी पोलिसांची माहिती आहे.
झटपट पैसा मिळविण्यासाठी शहरात देहव्यवसाय चांगलाच फोफावला आहे. शहरातील लक्ष्मीनगर व वैशालीनगर या वस्त्यांमध्ये सुरू असलेल्या देहव्यवसायावर सामाजिक सुरक्षा पथकाने शुक्रवारी धाड टाकली. वैशालीनगरात वर्षा सुनील वानखेडे (३४) ही महिला घरीच कुंटणखाना चालवित असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून २ हजारात सौदा केला. वर्षाने एका २४ वर्षीय युवतीला बोलावून घेतले. तिकडे सामाजिक सुरक्षा पथकाचे कर्मचारी तैनात होते. बनावट ग्राहकाकडून संकेत मिळाल्याबरोबरच पथकाने धाड घालून वर्षा वानखेडेला अटक केली. वर्षा गेल्या ६ वर्षापासून या व्यवसायात सक्रिय असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दुसरी घटना लक्ष्मीनगरातील इंद्रनील अपार्टमेंटमध्ये घडली. हिरालाल शंकरलाल गुप्ता (५८) याने अपार्टमेंटच्या तळमजल्यावर देहव्यवसायासाठी फ्लॅट भाड्याने घेतला होता. त्याला इंदोरा येथील नेहा ऊर्फ बरखा देवीदास काबळे (३५) ही महिला या व्यवसायात मदत करीत होती. याप्रकरणाचीही माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली असता, शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता बनावट ग्राहक पाठवून ६ हजारात सौदा केला. नेहाने २५ व ४० वर्षाच्या दोन महिलांना बोलावून घेतले. लगेच पथकाने धाड टाकून दोन महिलांना ताब्यात घेतले तर नेहा कांबळे व हिरालाल गुप्ता याला अटक केली. दोन्ही प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिन्ही दलालांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (पिटा) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तीन महिलांना सुधार गृहात पाठविले आहे. अटक करण्यात आलेला हिरालाल गुप्ता हा ठाकूर नावाने या व्यवसायात गेल्या १० वर्षापासून सक्रिय होता, असे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या नेतृत्वात, अमिता जयपूरकर, पांडुरंग निकुरे, अस्मिता मेश्राम, मंदा गायकवाड या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.