शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

बाईकला शिवरायांचा स्टिकर लावल्यानं दलित तरुणाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 3:50 PM

दलित असूनही शिवरायांचा स्टिकर का लावलास, अशी विचारणा करुन मारहाण

मेहसाणा: छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे होते, त्यांनी धर्म-पंथ कधीच मानला नाही, असं आपण इतिहासात शिकलो आहोत. शिवरायांच्या सैन्यात सर्व जाती पंथांच्या व्यक्तींचा भरणा होता, हे तर आपण अनेकदा वाचलं आणि ऐकलं आहे. माणसाला माणूस म्हणून वागवा, ही शिवरायांची शिकवण होती. मात्र महाराजांनी दिलेल्या या शिकवणीच्या अगदी विरुद्ध घटना गुजरातच्या मेहसाणामध्ये घडली आहे. मेहसाणातील बहुचराजी गावातील सवर्णांनी एका दलित तरुणाला मारहाण केली आहे. दुचाकीला शिवरायांचं स्टिकर लावल्यानं सवर्ण तरुणांनी दलित युवकाला बेदम मारलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. मेहसाणातील बहुचराजीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दलितांवरील अत्याचारांच्या बातम्या समोर येत आहेत. या भागात क्षत्रित समाजाचं प्राबाल्य आहे. याच क्षत्रिय समाजाच्या तरुणांनी दलित तरुणाला बेदम मारहाण केली. दुचाकीवर शिवरायांचं स्टिकर लावल्यानं सवर्ण तरुणांनी ही मारहाण केली. मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचं नाव जयदेव परमार असं आहे. 20 वर्षांचा जयदेव बहुचराजीमध्ये सुरू झालेल्या मारुतीच्या कारखान्यात काम करायचा. जयदेव कंपनीतून घरी जात असताना त्याला काही सवर्ण तरुणांनी त्याला चौकात बोलावलं. जयदेव परमार चौकात पोहोचल्यावर सवर्ण तरुणांनी त्याच्या दुचाकीवर लावलेल्या स्टिकरवरुन त्याला मारहाण सुरू केली. यावेळी मारहाण करणाऱ्या काही तरुणांनी दुचाकीवरील स्टिकर काढण्याचा प्रयत्न केला. दलित असूनही शिवाजी महाराजांचं स्टिकर बाईकला का लावतोस, अशी विचारणा करुन तरुणांनी जयदेवला शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर जयदेवनं तरुणांना स्टिकर काढण्याचं आश्वासन दिलं. यानंतर क्षत्रिय समाजाच्या तरुणांनी त्याला जखमी अवस्थेत त्याच्या घरी सोडलं. जयदेवला घरी सोडताना तरुणांनी त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली.  

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजGujaratगुजरातDalit assaultदलितांना मारहाण