- यशपाल गोयलजयपूर (राजस्थान) : विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून जगदीश मेघवाल (वय ३२) या दलित व्यक्तीला पळवून नेऊन काठ्यांनी मारहाण करून हत्या केल्याच्या आरोपावरून चारजणांना रविवारी अटक करण्यात आली, तर एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. या हत्येच्या व्हिडिओ क्लीपमुळे खळबळ निर्माण झाली आहे. मुकेश कुमार, दिलीप, सिकंदर आणि हंसराज अशी आरोपींची नावे आहेत. जगदीश मेघवाल हा रोजंदारीवर काम करायचा. त्याचे गेल्या ४ वर्षांपासून मुकेश कुमारच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुन्हे) रवी प्रकाश यांनी सांगितले. आरोपींनी मेघवाल याला सूरतगढ (जिल्हा हनुमानगढ) येथून ताब्यात घेऊन जवळच्या शेतात नेले. तेथे क्रूरपणे मारहाण करून प्रेमपुरा खेड्यातील त्याच्या घराबाहेर फेकून दिले. त्याला रुग्णालयात नेले जात असताना त्याचा मृत्यू झाला.
राजस्थानात दलित व्यक्तीची मारहाण करून हत्या, विवाहबाह्य संबंधाचा संशय; चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 09:23 IST