शहरं
Join us  
Trending Stories
1
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

Cyclone Vayu Update : गुजरातच्या पोरबंदर, द्वारकाला हुलकावणी देत वायू चक्रीवादळ पुढे सरकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 10:12 AM

गुजरातच्या पोरबंदर, द्वारकाला हुलकावणी देत वायू चक्रीवादळ पुढे सरकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ मनोरमा मोहंती यांनी दिली आहे.

अहमदाबादः गुजरातच्या काही भागांत ‘वायू’ वादळाचा प्रभाव जाणवला आहे. गुजरातच्या पोरबंदर, द्वारकाला हुलकावणी देत वायू चक्रीवादळ पुढे सरकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ मनोरमा मोहंती यांनी दिली आहे. वायू चक्रीवादळ हे गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याला धडकणार नाही. हे चक्रीवादळ वेरावल, पोरबंदर, द्वारकाजवळून जाणार असून, गुजरातल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात वादळ आणि पाऊस येणार आहे. आज दुपारी सौराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावरून चक्रीवादळ 135 ते 160 किलोमीटर प्रतितासाच्या वेगानं पुढे सरकणार आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवरील जिल्हे दीव, गीर सोमनाथ, जुनागड, पोरबंदर आणि द्वारका प्रभावित होणार आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रातही पाहायला मिळतो आहे. कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे.  गुजरातच्या काही भागांत गुरुवारी ‘वायू’ वादळ धडकणार असल्याच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्याजवळील 3 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. सौराष्ट्र व कच्छमधील बंदरे व विमानतळांवरे बंद करण्यात आली आहेत. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वायू चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग वाढला आहे.तसेच गुजरातला जाणाऱ्या 70 मेल रद्द करण्यात आल्या आहेत. अहमदाबाद विमानतळ बंद राहणार आहे. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्याही आज धावणार नाहीत. गुजरातच्या 10 जिल्ह्यांना या चक्रीवादळाचा फटका बसेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून मुंबई तसेच कोकणपट्टीतील सर्व किनारे पर्यटकांसाठी बंद केले आहेत. खराब हवामानामुळे बुधवारी मुंबई विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आले होते. मुंबईत बुधवारी जोरदार वारे वाहत होते. समुद्राच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झाली होती. गोवा, मुंबई, कोकणपट्टी तसेच गुजरातच्या समुद्रात मोठ्या लाटा दिसत होत्या. गुजरातच्या अनेक भागांत जोरदार वारे वाहत होते आणि प्रचंड पाऊसही झाला. 

टॅग्स :Cyclone Vayuवायू चक्रीवादळ