शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Cyclone Amphan: महाचक्रीवादळ 'अम्पन' उद्या पश्चिम बंगाल किनारपट्टीला धडकणार, ' या ' राज्यांना धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 7:28 PM

पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा

ठळक मुद्देपुढील तीन दिवस गोव्यासह राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यताराज्यात गेल्या २४ तासात मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पडला पाऊस

पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले महाचक्रीवादळ अम्पन' आता अतिशय धोकादायक झाले असून उद्या बुधवारी ते पश्चिम बंगालमधील दिघा ते बांगला देशातील हटिया दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.यामुळे किनारपट्टीवरील राज्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

हे महाचक्रीवादळ मंगळवारी दुपारी पश्चिम बंगालमधील दिघापासून ५१० किमी, ओडिशातील दक्षिण पॅरादीपपासून ३६० किमी आणि बांगला देशातील खेपुपारा येथून ६५० किमी दूर होते.गेल्या ६ तासापासून ते ताशी १८ किमी वेगाने किनार्‍याकडे येत आहे़.  हे महाचक्रीवादळ दिघा ते हटिया दरम्यान २० मेरोजी सायंकाळी धडकण्याची शक्यता आहे. त्यावेळी या महाचक्रीवादळाचा वेग ताशी १५५ ते १६५ किमी असण्याची शक्यता आहे. या महाचक्रीवादळामुळे ओडिशातील बहुतांश जिल्ह्यात १९ व २० मे रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या महाचक्रीवादळामुळे समुद्रात ५ मीटरपर्यंत उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्ची घरे, वीजेचे खांब, रेल्वे मार्ग, रस्ते यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.राज्यात गेल्या २४ तासात मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.  उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. पुढील तीन दिवस गोव्यासह राज्यातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. २० ते २३ मेदरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Puneपुणेcycloneचक्रीवादळSea Routeसागरी महामार्गIndiaभारतweatherहवामान