शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सायबर, लेझर, स्पेस आणि रोबो; लष्करप्रमुखांनी सांगितली भविष्यामधील युद्धातील अस्त्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 12:42 IST

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भौतिक जगासोबतच युद्धसामुग्रीमध्येही आमुलाग्र बदल होऊ लागले आहेत. बदलत्या काळासोबत  विविध अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकसित होऊ लागली आहेत.

नवी दिल्ली -  विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे भौतिक जगासोबतच युद्धसामुग्रीमध्येही आमुलाग्र बदल होऊ लागले आहेत. बदलत्या काळासोबत  विविध अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकसित होऊ लागली आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशाचे लष्करप्रमुख बीपीन रावत यांनी डीआरडीओमधील एका कार्यक्रमात बोलताना भविष्यातील संभाव्य धोक्यांचा सामना करण्यासाठी लष्कराकडून सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली. ''आता आमची नजर भविष्यातील युद्धात उपयुक्त ठरेल, अशी प्रणाली विकसित करण्यावर आहे,'' असे रावत यांनी सांगितले.  बीपीन रावत म्हणाले की, भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सायबर, स्पेस, लेझर, इलेक्ट्रॉनिक आणि रोबोटिक टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. डीआरडीओने देशासाठी खूप असे काम केले आहे, ज्यामुळे लष्कराला खूप फायदा झाला आहे.'' ''आता आम्ही यापुढे जेव्हा कधी पुढील लढाई लढू तेव्हा त्यात विजयी ठरू, याचा मला पूर्ण विश्वास आहे. हा विजय स्वदेशी हत्यारांच्या बळावर मिळेल,'' असेही लष्करप्रमुखांनी पुढे सांगितले. यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीसुद्दा तंत्रज्ञानावर आघारित होणाऱ्या भविष्यातील लढायांचा सामना करण्यासाठी आपल्या देशाला तयार राहावे लागेल, असे वारंवार सांगितले आहे.   यावेळी नौदलप्रमुख कमरबीर सिंह यांनी सांगितले की, ''आता आपल्याला तीन बाबतीं काम करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटते. आपल्याल तंत्रज्ञानाचा खूप वापर करावा लागेल. सोबतच अमेरिका कशाप्रकारे आगेकूच करत आहे, कुठल्या प्रकल्पांवर काम करत आहे त्यावर लक्ष ठेवले पाहिजे. त्याबरोबरच डीआरडीओने लवकर तयार होऊ शकतील, अशी छोटी शस्त्रास्त्रे विकसित करावीत.''  

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवानwarयुद्धIndiaभारतDRDOडीआरडीओ