सहारनपूर : हिंसाचारप्रभावित सहारनपूरमधील स्थिती नियंत्रणात येताच जिल्हा प्रशासनाने आज सोमवारी येथील संचारबंदी काही तासांसाठी शिथिल केली़ जिल्हाधिकारी संध्या तिवारी यांनी सांगितले की, स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे़ यामुळे लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडता यावे म्हणून नवा शहर भागात आज सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत तर जुना शहर भागात दुपारी ३ ते संध्याकाळी ७ पर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली़दरम्यान, सहारनपूरमधील स्थिती पूर्णत: नियंत्रणात असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले़ (वृत्तसंस्था)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}