जम्मू-काश्मीरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी झालेल्या एका भीषण अपघातात सीआरपीएफ जवानासह चार जणांचा मृत्यू झाला. उधमपूर जिल्ह्यात एक बस आणि पिकअप ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सीआरपीएफच्या १३७ व्या बटालियनचे सेकंड-इन-कमांड करतार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ५२ व्या बटालियनच्या एका जवानाचाही मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि जवळच्या रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे.
याआधी, डोडा येथे झालेल्या अन्य एका अपघातात जवान रिंकिल बालियान आणि इतर नऊ सैनिक शहीद झाले होते. खराब हवामानामुळे लष्कराचं वाहन रस्त्यावरून घसरून हा अपघात झाला होता. या घटनेनंतर लष्कर आणि प्रशासनाच्या पथकांनी तातडीने बचावकार्य राबवलं होतं.
भाजपा खासदार अरुण गोविल आणि भाजपा नेते संजीव बालियान यांनी जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात शहीद झालेले जवान रिंकिल बालियान यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं.
Web Summary : A bus and truck collided on the Jammu-Srinagar highway, killing four, including a CRPF jawan. The accident occurred in Udhampur, injuring several others. Earlier, nine soldiers died in Doda due to a vehicle accident caused by bad weather. BJP leaders consoled the family of a deceased soldier.
Web Summary : जम्मू-श्रीनगर राजमार्ग पर बस और ट्रक की टक्कर में सीआरपीएफ जवान समेत चार की मौत हो गई। हादसा उधमपुर में हुआ, जिसमें कई घायल हो गए। इससे पहले डोडा में खराब मौसम के कारण वाहन दुर्घटना में नौ सैनिक शहीद हो गए थे। भाजपा नेताओं ने शहीद सैनिक के परिवार को सांत्वना दी।