उनकेश्वर येथे भाविकांची गर्दी

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:30+5:302015-02-18T00:13:30+5:30

मांडवी : हेमाडपंथी शिवमंदिर असलेल्या उनकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त अभिषेक, होमहवन, पूजाअर्चा व अभ्यंगस्नान करण्याकामी भाविकांची रेलचेल वाढली आहे़

The crowd of devotees at Uneskeshwar | उनकेश्वर येथे भाविकांची गर्दी

उनकेश्वर येथे भाविकांची गर्दी

ंडवी : हेमाडपंथी शिवमंदिर असलेल्या उनकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त अभिषेक, होमहवन, पूजाअर्चा व अभ्यंगस्नान करण्याकामी भाविकांची रेलचेल वाढली आहे़
माहूर गडापासून ४० कि़मी़ असलेल्या उनकेश्वर येथे गरम पाण्याचा झरा, हेमाडपंथी शिवमंदिर, बहुगुणी वनौषधीची उपलब्धता, ज्ञानधारणा, निसर्गोपचार केंद्र व भजन-कीर्तन हे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत आहे़ इतर राज्यातून येणार्‍या भाविकांना राहण्याची व्यवस्था म्हणून भक्तनिवासाची सोय आहे़ उनकेश्वर हे पर्यटन स्थळ म्हणून टप्प्याटप्प्यात विकसित होत आहे़ यात्रेकरूंच्या गैरसोयी दूर करण्याकामी मंदिर व्यवस्थापनाचे अरूण राठोड, राधाकिशन कनाके, रमेश दुंडूलवार आदींचे नियंत्रण आहे़

मांडवीत श्रद्धांजली
मांडवी : माजीमंत्री आऱआऱ पाटील व जरूर तांडा येथील चंदू ज्योतीराम चव्हाण यांना मांडवीत त्यांच्या चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली़ यावेळी विनोद पाटील, अविनाश चव्हाण, चंदन मांडण, सुनील श्रीमनवार, मधुकर शेंडे, अरविंद पवार, गणेश चव्हाण, मारोती गेडाम, दिलीप रामटेके, विश्वास कांबळे, माधव शेंद्रे, विठ्ठल जाधव, विठ्ठलसिंह गौतम (ठाकूर), सचिन चव्हाण, कामराज जाधव, दामोधर तोडासाम आदींची उपस्थिती होती़

Web Title: The crowd of devotees at Uneskeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.