शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
2
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
3
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
4
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
5
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
6
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
7
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
8
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
9
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
10
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
11
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
12
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
13
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
14
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
15
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
16
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
17
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
18
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
19
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
20
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्रीनिमित्त जेजुरीत एक लाखावर भाविकांची गर्दी

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

जेजुरी : महाशिवरात्रीनिमित्त जेजुरी गडावर त्रैलोक्याचे दर्शन घेण्यासाठी एक लाखावर भाविकांनी गर्दी केली होती. सदानंदाच्या जयघोषात भंडार खोबर्‍याच्या उधळणीत भाविकांनी महाशिवरात्रीचे पुण्य पदरात पाडून घेतले.

जेजुरी : महाशिवरात्रीनिमित्त जेजुरी गडावर त्रैलोक्याचे दर्शन घेण्यासाठी एक लाखावर भाविकांनी गर्दी केली होती. सदानंदाच्या जयघोषात भंडार खोबर्‍याच्या उधळणीत भाविकांनी महाशिवरात्रीचे पुण्य पदरात पाडून घेतले.
जेजुरी गडावरील मुख्य मंदिराच्या कळसात असणारे स्वर्गलोकीचे शिवलिंग, गाभार्‍यातील भूलोकीचे शिवलिंग आणि तळघरातील पाताळलोकींचे शिवलिंग असा तिहेरी दर्शनाचा योग आज येथे आलेल्या भाविकांनी साधला.
आज मध्यरात्री १२ वाजता शिखरातील तसेच तळघरातील शिवलिंगे उघडण्यात आली. एकच्या सुमारास महापूजा व अभिषेक व मानाच्या पूजा घालण्यात आल्या. मानकरी वासकर व सोनवणे परिवारासह देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, विश्वस्त ॲड. वसंत नाझीरकर, उपनगराध्यक्ष गणेश आगलावे, स.पो.नि. रामदास शेळके, नगरसेवक जयदीप बारभाई, तसेच पुजारी, सेवकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते. या नंतर पहाटे दोननंतर भविकांच्या दर्शनासाठी ही शिवालये खुली करण्यात आली. भाविकांनी रांगा लावून देवदर्शन घेतले. आज दिवसभर भाविकांची गडावर मोठी गर्दी होती.
जेजुरी गडाबरोबरच जुनागड, कडेपठार मंदिरातही भाविकांची गर्दी होती. शहारालगतची प्राचीन शिवमंदिरे लवथळेश्वर, बल्लाळेश्वर, भुलेश्वर, पांडेश्वर, साकुर्डे येथील रामेश्वर, शंकरेश्वर, आदी ठिकाणीही भाविकांची गर्दी होती.
यात्राकाळात भाविकांना देवदर्शन सुलभ व्हावे म्हणून जेजुरी पोलीस ठाण्याचे स.पो.नि. रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ४ पोलीस अधिकारी व ७० पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. देव संस्थानच्या वतीने भविकांसाठी दर्शनरांग, फराळ वाटप, तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध केली होती. तसेच सी.सी.टी.व्ही.द्वारे मंदिर परिसर व गडाच्या पायथ्याशी देवदर्शनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. संपूर्ण गड व कडेपठार डोंगर गर्दीने फुलून गेला होता. उद्या बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत भाविकांसाठी ही तीनही शिवालये दर्शनासाठी खुली राहणार आहेत.

फोटो मेल केले आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त जेजुरी गडावर भाविकांच्या दर्शनासाठी लागलेली रांग व गर्दी.


(संपादन : बापू बैलकर)