शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीचा गंडा घालणार्‍या कौशल इन्व्हेस्टमेंटच्या संचालकाला अटक

By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST

३ कोटी ७ लाखांची रोकड जप्त : महिन्याला दीडपट करुन देण्याचे आमिष

३ कोटी ७ लाखांची रोकड जप्त : महिन्याला दीडपट करुन देण्याचे आमिष
शिरूर : गुंतवणुकीच्या नावाखाली महिन्याला दीडपट परतावा देण्याचे आमिष दाखवून तालुक्यातील करडे येथील ५ जणांना ९ कोटी ३२ लाख रुपयांचा गंडा घालणार्‍या कौशल इन्व्हेस्टमेंट प्रा. लि., कल्याणीनगर या कंपनीच्या म्होरक्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुजरातमध्ये जेरबंद केले. त्याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कौशल विनोदकुमार ठाकर (वय ३३, रा. इंद्रायणी हौसिंग सोसायटी, चंदननगर पुणे, मूळ सुरेंद्रनगर, गुजरात) असे त्याचे नाव आहे़ त्याने ५ साथीदारांसह कौशल इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. ही कंपनी स्थापन करून करडे (ता. शिरूर) येथे बस्तान बसविले होते. सीमाशुल्क विभागाने पकडलेला माल (सोने, चांदी, तांबे, टीव्ही, एलईडी, मोबाईल, एसी आदी) विकत घेऊन त्याची विक्री केली जाते. यासाठी लागणारी रक्कम ठेवीच्या स्वरूपात स्वीकारायची व ठेवीदाराला ३० दिवसांत मुद्दलाच्या दीडपट रक्कम द्यायची. यातील मुद्दल पुन्हा ३० दिवसांसाठी गुंतवणूक म्हणून ठेवून घ्यायचे. त्याचा परतावा द्यायचा तसेच ६ महिन्यांनी मुद्दल परत करायचे, हा या इन्व्हेस्टमेंट कंपनीचा धंदा होता. याला करडे येथील पाच जण बळी पडले.
काही महिन्यांनी परतावा परत मिळत नाही दिसल्यावर नवनाथ पंडित लंघे (रा. करडे) यांनी २७ जुलै रोजी पोलिसांत तक्रार दिली. लंघे यांची ५५ लाख, काळूराम बगाडे यांची ७४ लाख ५० हजार, दिलीप वाघ यांची ७५ लाख, विशाल घायतडक यांची ५ कोटी ९९ लाख तर संदीप बांदल यांची १ कोटी २८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे पुढे आले होते. याप्रकरणी कौशल ठाकर, सुरेंद्र गोविंद आगरवाल, सचिन पंड्या, शिखा आगरवाल, वैशाली ठाकर व विठाबाई ठाकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी फरार होते.
या गुन्‘ाच्या तपास पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे दिला होता. अपहार केलेल्या रकमेबाबत ठाकर यांच्याकडे तपास केला असता, जुलै महिन्यात बंडगार्डन रोडवरील एका ज्वेलर्सकडे सोने खरेदीसाठी ३ कोटी ७ लाख रुपये ठेवल्याचे सांगितले़ या ज्वेलर्सच्या मालकास ठाकर याच्या अटकेबाबत माहिती मिळताच त्याने ही रक्कम पोलिसांकडे जमा केली.
-------------------------