शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

सगरोळी परिसरात अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान

By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST

सगरोळी : सगरोळीसह परिसरात शनिवारी व रविवारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसाच्या मोठा तडाका रबिसह अनेक पिकांना बसला असून यात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.

सगरोळी : सगरोळीसह परिसरात शनिवारी व रविवारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसाच्या मोठा तडाका रबिसह अनेक पिकांना बसला असून यात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.
सगरोळी परिसरात पावसाअभावी आधिच खरीप हंगाम हातचा गेला. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना अल्पशा पावसावर सगरोळी परिसरात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, सूर्यफूल, भात (साळ), ज्वारी या पिकावर शेतकरी मोठी भिस्त ठेवली होती मात्र शनिवारी आणि रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान करुन आधिच भर पाडली. या अवकाळी व वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसाने ज्वारीसह सर्व पिके पूर्णत: जमीनदोस्त झाली असून हरभरा, गव्हाची कापणी झाल्याने मातीत मिसळले तर ज्वारीचे कणसे जमीनीवर मातीत लोळत आहेत. सूर्यफूल व भात (साळ) पिकांचेही नासाडी झाल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले.
सगरोळी परिसरातील खतगाव, केसराळी, हिप्परगा (थडी), शिंपाळा, दौलतापूर, रांगोळी, बोळेगाव, लघूळ, येसगी, बाभळी, बडूर, कार्ला (खु), हिंगणी, पोखर्णी, बावलगाव, कार्ला (बु), गंजगाव, माचनूर आदी गावात हरभरा, गहू, सूर्यफूल व ज्वारांची पेरणी मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांनी केली होती. सध्या ही पिके कापली होती तर ज्वारी काढणीला तर काही शेतकरी काढणी करुन मोडणी व राशीची तयारी करीत होती. मात्र काढणी व राशी पूर्वीच अवकाळी पावसाने दगा दिल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचा पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे विश्वनाथ पाटील समन, परमेश्वर पाटील यांनी केली. एकंदरीत अगोदरच दुष्काळी परिस्थितीने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना वादळीवार्‍यासह अवकाळी पावसाला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. (वार्ताहर)