शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

हिमाचलमधील संकट टळले; जनादेश वाचवण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची काँग्रेसने केली तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2024 07:23 IST

हिमाचल प्रदेशातील एकमेव जागेसाठी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी मंगळवारी क्रॉस व्होटिंग केल्याने हे संकट निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिमला, नवी दिल्ली : मुख्यमंत्र्यांवर नाराज मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी बुधवारी तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे उत्तर भारतातील काँग्रेसची सत्ता असलेल्या हिमाचल प्रदेशातील राजकीय संकट अधिक गहिरे झाले होते. मात्र विक्रमादित्य सिंह  यांनी राजीनामा मागे घेतल्याने राज्यातील राजकीय तणाव कमी होण्याची चिन्हे आहेत.  पक्षश्रेष्ठींनी दोन निरीक्षकांना राज्याच्या दौऱ्यावर पाठवले असून जनादेश वाचवण्यासाठी कठोर निर्णय घेतले जातील, असे काँग्रेसने म्हटले आहे. दरम्यान, हिमाचलच्या विधानसभेत अध्यक्षांनी भाजपचे १५ आमदार निलंबित केले आहेत.

  हिमाचल प्रदेशातील एकमेव जागेसाठी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सहा आमदारांनी मंगळवारी क्रॉस व्होटिंग केल्याने हे संकट निर्माण झाले आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्यानंतर हरयाणाच्या पंचकुला येथे रवाना झालेले सहा आमदार बुधवारी शिमल्यात परतले. त्यात तीन अपक्ष आमदारांचाही समावेश होता.

विधानसभेत बुधवारी अर्थसंकल्प मंजूर करताना गोंधळ झाला. अध्यक्ष पठानिया यांनी जयराम ठाकूर यांच्यासह भाजपच्या १५ आमदारांना निलंबित केले.  काँग्रेसने राज्य विधानसभेत आपले बहुमत गमावले आहे, अशी भूमिका घेत भाजपने अर्थसंकल्पावर मतदानाची मागणी केली होती. परंतु, दुपारी भाजपचा एकही सदस्य उपस्थित नसताना वित्त विधेयक आवाजी मतदानाने मंजूर झाल्याने हे संकट तूर्तास टळले.

जनादेशाचा विश्वासघात होऊ देणार नाहीn‘काँग्रेस कठोर पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही कारण पक्षाला आमचे प्राधान्य आहे. सरकार असे पडत नाही. जनतेने आम्हाला जनादेश दिला आहे. n‘तो माघारी घेण्याचा अधिकार जनतेला आहे. हिमाचल प्रदेशात जनादेशाचा विश्वासघात होऊ देणार नाही,’ असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी यावेळी सांगितले.

पाच वर्षे सरकार चालवणारपक्ष श्रेष्ठींनी मला किंवा इतर कोणालाही राजीनामा मागितला नाही. राज्यातील भाजप नेत्यांनी ज्या प्रकारचे काम केले, त्यांना आपल्याच लोकांवर विश्वास नाही. सीआरपीएफ तैनात करण्यात आले. हरयाणा पोलिस तैनात करण्यात आले. हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. पण, हिमाचलची जनता आमच्यासोबत आहे. आमदार आमच्यासोबत आहेत. आम्ही नक्कीच हिमाचलचे सरकार पाच वर्षे चालवू. - सुखविंदर सिंह सुखू, मुख्यमंत्री

भाजपला जनादेश चिरडायचा आहे भाजपला राज्याला राजकीय संकटात ढकलायचे आहे. २५ आमदार असलेला भाजप जर ४३ आमदारांच्या बहुमताच्या सरकारला पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना जनतेचा अधिकार ठेचायचा असल्याचे दिसून येते. भाजप पैशाची ताकद, यंत्रणांची ताकद आणि केंद्रातील सत्तेचा गैरवापर करत आहे.- प्रियांका गांधी, सरचिटणीस, काँग्रेस

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशcongressकाँग्रेस