शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

बोटांच्या ठशांवरून ४८ तासांत महाराष्ट्रात होतेय गुन्ह्यांची उकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 12:34 AM

देशात सर्वाधिक १.६५ लाख बोटांचे ठसे राज्याने केले गोळा

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : महाराष्ट्रपोलिसांचे हात प्रत्येक ४८ तासांत एका गुन्ह्यातील गुन्हेगारांपर्यंत त्यांनीच मागे सोडलेल्या बोटांच्या ठशांवरून पोहोचत आहेत.केंद्रीय गृहमंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाकडील ताज्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात २०१९ मध्ये सगळ्यात जास्त १८२ गुन्ह्यांच्या ठिकाणी गुन्हेगारांच्या मिळालेल्या बोटांच्या ठशांवरून त्यांना ओळखता आले. देशात ६२६ गुन्ह्यांत हे शक्य झाले.

महाराष्ट्रात ३० जानेवारी, २०१९ रोजी चार वर्षांची मुलगी व तिची आई यांची गळा चिरून हत्या झाली होती. बोटांच्या ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळी रक्तात माखलेल्या बुटाचे ठसे मिळवले. त्यातून हे दोन खून मुलीच्या वडिलांनी स्वत:च्या मैत्रिणीच्या मदतीने केले, हे स्पष्ट झाले. हत्यांनंतर त्यांचे मृतदेह त्यांनी जाळून टाकले होते. घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांमुळे पोलीस खुन्यांपर्यंत पोहोचले.जून २०१९ मध्ये मुंबईत ज्वेलरी शोरूमचे शटर कापून लूट झाली होती. तेथे मिळालेल्या बोटांच्या ठशांवरून पोलीस गुन्हेगार मोहम्मद

जफर कलीम शेख याच्यापर्यंत पोहोचू शकले. या घटनेसोबत पोलिसांनी चुहा माना नावाच्या कुख्यात गुन्हेगाराला पकडून लुटीच्या ३४ गुन्ह्यांना एका फटक्यात सोडवले आणि लूटही जप्त केली.नंदुरबार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक ज्वेलरी शोरूममध्ये लूट झाली होती. तेथे तीन-चार बोटांचे ठसे हाती लागले. त्यामुळे लॉकर तोडून सोने आणि रोख लुटणारा संतोष तिजवीजला पकडता आले.

महिलांबाबतच्या गुन्ह्यांतही सर्वाधिक २८६ बोटांचे ठसे

च्महिलांबाबतच्या गुन्ह्यांतही महाराष्ट्रात सर्वाधिक २८६ बोटांचे ठसे आणि ४,८८० चान्स प्रिंट गोळा केले. च्राज्यात एका वर्षात चोरीच्या घटनांत १३,७३०, घरफोडीत ७,६४०, लुटीत ४,९१०, दरोड्यात १० डिजिटची सगळ्यात जास्त १,५३२ सर्च स्लिप बनवली गेली. च्याशिवाय फसवणुकीच्या ४,३६१, विश्वासघात २,७५४ आणि भारतीय दंड संहितेच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्ह्यांत ६९,५८६ सर्च स्लिप बनवल्या गेल्या.

1898 महाराष्ट्रात फिंगर प्रिंट ब्युरोची सुरुवात मुंबईत मध्ये झाली. 1905 मध्ये त्याचे मुख्यालय पुण्यात बनवले गेले. सीआयडीच्या (पुणे) एडीजी रँकच्या अधिकाºयाच्या मार्गदर्शनात काम करणाºया या विभागात चार शाखा असून, त्या पुणे आणि मुंबईशिवाय नागपूर आणि औरंगाबादेत कार्यरत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रMumbai policeमुंबई पोलीस