शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
2
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
3
Top Marathi News Live: विजय यांची बहुमत जुळवण्यासाठी धडपड, आणखी एका पक्षाला पाठवले पत्र
4
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
5
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
6
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
7
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
8
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
9
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
10
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
11
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
12
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
13
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
14
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
15
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
16
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
17
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
18
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
19
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
20
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हे वार्ता

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार अटकेत नागपूर : एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सोनेगाव पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना अटक केली. अतुल अशोक नंदरधने (२५) रा. मनीषनगर, राहुल गुलाबराव रामटेके (२२) रा. न्यू वैशालीनगर, पवन दिलीप कांबळे (१९) रा. रामबाग, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या ...


घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार अटकेत

नागपूर :
एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सोनेगाव पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना अटक केली.
अतुल अशोक नंदरधने (२५) रा. मनीषनगर, राहुल गुलाबराव रामटेके (२२) रा. न्यू वैशालीनगर, पवन दिलीप कांबळे (१९) रा. रामबाग, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या जवळून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटार सायकल व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख १३ हजाराचा माल जप्त केला. ही कामगिरी पोलीस निरीक्षक प्रकाश शहा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास प्रमुख सरदार नाळे, पोलीस शिपाई ललित तितरमारे, ज्ञानेश्वर बांते व शैलेंद्र यांनी बजावली.
------------------------------------
महिलेने गळफास घेतला

नागपूर :
नवीन बाभुळखेडा मैत्री बौद्ध विहारजवळ राहणाऱ्या एका ३८ वर्षीय महिलेने गुरुवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला.
दर्शना शैलेंद्र वासनिक असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

अपघातातील जखमीचा मृत्यू

नागपूर :
अपघातात जखमी होऊ बेशुद्धावस्थेत सापडलेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राजू रामराजे रा. पिवळी नदी असे मृताचे नाव आहे. ९ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास राजू यशोधरानगर येथील मलानी कंपनीच्या कम्पाऊंडजवळ बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. परंतु या प्रकरणाची चौकशी करताना राजू यांना अपघात झाल्याचे निष्पन्न झाले. एका वाहन चालकाने त्यांना धडक दिली आणि तो पळून गेला होता. त्यानुसार पोलिसांनी आरोपी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वयोवृद्धाची आत्महत्या

नागपूर :
मनीषनगर येथील एका ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीने गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली.
कृष्णराव चौधरी असे मृताचे नाव आहे. सोनेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.