शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: दोन पुरुष, एक महिला; एकाच कारमध्ये मृतदेह सापडलेल्या त्या तीन व्यक्तींचा संबंध काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 12:05 IST

राजधानी दिल्लीतील पीरागढी चौकात रविवारी खळबळ माजली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा मृतदेह सापडला. 

Delhi Peeragarhi crime story: रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारमध्ये तीन मृतदेह आढळून आले आणि दिल्लीतील पीरागढी उड्डाणपूल परिसरात खळबळ उडाली. एक महिला आणि दोन पुरुषांचे कारमध्ये होते. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला आणि त्यांचे एकमेकांशी काय संबंध होते? असे प्रश्न पोलिसांसमोर होते. त्यातील काही प्रश्नांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

दिल्ली पोलिसांना रविवारी (८ फेब्रुवारी) दुपारी कॉल करून याबद्दलची माहिती दिली गेली होती. ३.५० वाजता नियंत्रण कक्षात कॉल करून सांगण्यात आले की, कारमध्ये तीन व्यक्ती असून, ते कोणताही प्रतिसाद देत नाहीये. रणधीर, शिवनरेश आणि लक्ष्मी देवी अशी मृतदेह सापडलेल्यांची नावे आहेत. 

या प्रकरणात पोलिसांना कोणती माहिती मिळाली?

तिहेरी मृत्यू प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कारमध्ये दोन पुरुषांमध्ये मृतदेह सापडलेल्या लक्ष्मीची शिव नरेश यांच्यासोबत ओळख होती. दोघांचेही जवळचे संबंध होते. शिव नरेश आणि रणधीर हे मागील ६ वर्षांपासून सोबत प्रॉपर्टीचे काम करत होते. 

कारमच्या मागच्या सीटवर शिव नरेश याचे हेल्मेट आणि ट्रॅक सूट पोलिसांना मिळाला. पण, त्याची मोटारसायकल कुठे आहे, याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. शिव नरेश हा मूळचा उत्तर प्रदेशातील एटा रहिवासी आहे. 

रणधीर आणि शिव नरेश हे दोघे दिल्लीत रणहोला परिसरात राहायला होते. लक्ष्मी जहांगीरपुरी भागात राहत होती. ज्या कारमध्ये तिघांचे मृतदेह मिळाले, ती कार रणधीरची असल्याचे पोलिसांनी सांगितले 

कारमध्ये डोकावताच अधिकारी हादरले

रविवारी माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी कारमधील दृश्य बघितले आणि हादरले. रणधीर सिंह (७६ वर्ष), शिवनरेश सिंह (४७ वर्षे) आणि लक्ष्मी देवी (४० वर्षे) या तिघांचे मृतदेह कारमध्ये पडलेले होते. 

पोलिसांनी कारची झाडाझडती घेतली, तेव्हा कारमध्ये काही सामानही मिळाले. सॉफ्ट ड्रिंकची बॉटल, हेल्मेट, रुमाल आणि ट्रॅक सूट इत्यादी साहित्य पोलिसांनी जप्त केले. या तिघांच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आता सीसीटीव्ही फुटेज बघणे सुरू केले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi: Three found dead in car; relationship investigated.

Web Summary : Three bodies were discovered in a car near a Delhi flyover. Police identified the deceased as Randhir, Shivnaresh, and Laxmi. Laxmi and Shivnaresh were acquainted, while Shivnaresh and Randhir worked together. The investigation is ongoing, focusing on CCTV footage to determine the cause of death.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिसDeathमृत्यूNew Delhiनवी दिल्ली