चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 19:07 IST2025-07-23T19:06:29+5:302025-07-23T19:07:07+5:30
Crime News: तब्बल ४ किलो सोनं चोरणारा आणि नंतर जुगारामध्ये २५ लाख रुपये जिंकणारा एक चोर केवळ एका सेकंड हँड मोबाईल फोनमुळे पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याची घटना दिल्लीत घडली आहे. मनोज असं या चोराचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, आता त्याची पुढील चौकशी सुरू आहे.

चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर
तब्बल ४ किलो सोनं चोरणारा आणि नंतर जुगारामध्ये २५ लाख रुपये जिंकणारा एक चोर केवळ एका सेकंड हँड मोबाईल फोनमुळे पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याची घटना दिल्लीत घडली आहे. मनोज असं या चोराचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, आता त्याची पुढील चौकशी सुरू आहे.
करोल बाग येथील एका ज्वेलरी शाॉपमध्ये १२ वर्षांपासून काम करणाऱ्या मनोज याच्याकडे मालकाने दुकानातील सुमारे ७० ते ८० किलो सोन्याची जबाबदारी मोठ्या विश्वासाने सोपवली होती. मात्र या विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने मालकाच्या नजरेखालून थोडं थोडं करत ४ किलो सोनं लंपाक केलं होतं. मात्र या चोरीची कुणाला साधी कुणकुणही लागली नव्हती. मागच्या महिन्यात २६ जूनपासून त्याने कामावर येणं बंद केलं. तर त्याच्या पत्नीने तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ज्वेलर्सच्या दुकानातील सोन्याची पडताळणी केली असता सुमारे ३ किलो ९८० ग्रॅम सोनं गायब असल्याचं आढळून आलं. त्यानंतर पोलिसांनी मनोज याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
याचदरम्यान, मनोज याने ऑनलाइन जुगारामध्ये तब्बल २० लाख रुपये जिंकले होते. तसेच तो पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून विविध ठिकाणी फिरत होता. दरम्यान, दिल्ली पोलिसांकडून सीसीटीव्ही चित्रफितींची तपाणसी करून एकेक पुरावा शोधला जात होता. त्याचदरम्यान, मनोज हा आग्रा कँट येथे दुचाकी पार्क करताना दिसला. पोलिसांनी अधिक तपास केला असता. त्याने तिथे एक सेकंड हँड मोबाईल खरेदी केल्याची माहिती मिळाली. तसेच हाच फोन मनोजपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना महत्त्वाचा धागा ठरला. त्यानंतर बंगळुरूमध्ये रेल्वे स्टेशनवरील चित्रफितीमध्ये मनोज दिसला होता. त्यानंतर मनोज याने आणखी एक सेकंड हँड फोन खरेदी केला.पोलिसांकडून सुमारे १७ दिवस चाललेल्या शोधमोहिमेनंतर मनोज हा तामिळनाडूमधील उटी येथे सापडला. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. तसेच त्याच्याकडून १०० ग्रॅम सोने,२.३ लाख रुपये रोख आणि दोन मोबईल पोलिसांनी जप्त केले.
आरोप मनोज याला जुगाराचा नाद लागला होता. तो बेटिंग अॅप्सवर मोठ्या प्रमाणात पैसे लावत होता. तसेच लॉकडाऊनमध्ये जुगाराचा नाद वाढल्यावर त्याने ज्वेलर्सच्या शोरूममध्ये चोरी करण्यास सुरुवात केली. तसेच थोडं थोडं करत सुमारे चार किलो सोनं लंपास केल्याची कबुली त्याने दिली. तसेच ऑनलाइन जुगारामध्ये त्याने २० लाख रुपयेसुद्धा जिंकले होते. दरम्यान, आता या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.