हॉटेलमध्ये झिंगाट पार्टी, नंतर चौघांमध्ये झाला वाद, रागाच्या भारात अंगावर घातली कार, तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 09:59 IST2023-12-27T09:58:59+5:302023-12-27T09:59:27+5:30

Crime News: राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे चार मित्रमैत्रिणी पार्टीकडून सकाळी हॉटेलमधून निघाले. मात्र वाटेत त्यांचं भांडण झालं. यादरम्यान, एका संतापलेल्या मित्राने एक तरुणी आणि तिच्या मित्राच्या अंगावर कार चढवून त्यांना चिरडले.

Crime News: party in a hotel, then an argument between friends, in a fit of rage, the young woman is crushed under a car | हॉटेलमध्ये झिंगाट पार्टी, नंतर चौघांमध्ये झाला वाद, रागाच्या भारात अंगावर घातली कार, तरुणीचा मृत्यू

हॉटेलमध्ये झिंगाट पार्टी, नंतर चौघांमध्ये झाला वाद, रागाच्या भारात अंगावर घातली कार, तरुणीचा मृत्यू

राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे चार मित्रमैत्रिणी पार्टीकडून सकाळी हॉटेलमधून निघाले. मात्र वाटेत त्यांचं भांडण झालं. यादरम्यान, एका संतापलेल्या मित्राने एक तरुणी आणि तिच्या मित्राच्या अंगावर कार चढवून त्यांना चिरडले. त्यानंतर या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तरुणीचा मृत्यू झाला. तर तिच्यासोबत असलेला तरुण हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंगावर कार घालून तरुणीचा जीव घेतल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. आता पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना जयपूरमधील जवाहर सर्कल ठाणे परिसरातील गिरधर मार्गावर घडली. तेथील एव्हरलँड विश हॉटेलमधून मंगेश अरोडा, राजकुमार जाट, उमा माथूर आणि आणखी एक तरुणी अशी चार जणं मंगळवारी पहाटे बाहेर पडले. त्यानंतर रस्त्यावर या चौघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर मंगेश अरोडा आणि एक तरुणी कारमध्ये बसले. 

त्यानंतर त्यांनी बाहेर उभ्या असलेल्या राजकुमार आणि उमा यांच्या अंगावर कार घातली. या धडकेमुळे राजकुमार हा दूर जाऊन पडला. तर ही कार उमाच्या अंगावरून भरधाव वेगाने गेली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कार अंगावर घातल्यानंतर आरोपी फरार झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या या तरुण आणि तरुणीला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान उमा नावाच्या तरुणीचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या राजकुमार याने सांगितले की, मंगेशने उमासोबत गैरवर्तन केलं होतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये भांडण झालं होतं. मंगेशने आधी त्यांना बेसबॉलने मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या अंगावर कार घातली. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Crime News: party in a hotel, then an argument between friends, in a fit of rage, the young woman is crushed under a car