तीन मुलगे आणि २ मुलींचे आक्षेपार्ह चाळे करतानाचा तब्बल ४८ व्हिडीओ अचानक व्हायरल होऊ लागलयाने खळबळ उडाली आहे. हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका गावात घडला आहे. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार हे व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी चित्रित करण्यात आलेले होते. मात्र ते कुणाच्या तरी बेफिकीरीमुळे किंवा जाणीवपूर्वक आखलेल्या षडयंत्रामुळे अचानक एका मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलवर असे व्हायरल होऊ लागले आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार व्हायरल होत असलेले हे ४८ व्हिडीओ सुमारे ३ महिन्यांपूर्वी चित्रित करण्यात आले होते. मात्र ३१ मार्च रोजी ते अचानक व्हायरल होऊ लागले. या व्हिडीओमध्ये असलेले मुलगे आणि मुलींचे वय सुमारे १४ ते १७ वर्षांदरम्यान आहे. गावात श्रीरामाची जत्रा सुरू असतानाच हे व्हिडीओ व्हायरल झाले. त्यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर फौजपाटा तैनात केला आहे. तसेच या प्रकरणी कारवाई करत पोलिसा्नी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे या व्हिडीओमधील मुली या हिंदू तर मुलगे मुस्लिम समाजातील आहेत. त्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनलं आहे.
दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत एका आरोपीने आपला बचाव करताना, मी माझा जुना फोन विकला होता. कदाचित त्या फोनच्या माध्यमातूनच व्हिडीओ लीक झाले असावेत, असे सांगितले. मात्र त्याचा हा दावा पीडितांच्या कुटुंबीयांनी फेटाळून लावला आहे. हा मुलांचं जीवन बरबाद करण्याचा कट आहे, असा आरोप पीडितांच्या कुटुंबीयांनी केला.
आता या प्रकरणाच्या तपासाची सुत्रे आग्र्याचे डीसीपी आदित्य सिंह यांनी आपल्या हातात घेतली आहेत. तसेच हे व्हिडीओ जिथून पहिल्यांदा शेअर झाले, ते सर्व आयपी अॅड्रेस आणि सोशल मीडिया लिंक ट्रेस करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Web Summary : Forty-eight obscene videos featuring three boys and two girls went viral in Agra, Uttar Pradesh, sparking tension. Police are investigating the leak, arresting two. The videos, filmed months ago, involve Hindu girls and Muslim boys, escalating the situation.
Web Summary : उत्तर प्रदेश के आगरा में तीन लड़के और दो लड़कियों के अश्लील वीडियो वायरल होने से तनाव बढ़ गया। पुलिस मामले की जांच कर रही है और दो लोगों को गिरफ्तार किया है। वीडियो हिंदू लड़कियों और मुस्लिम लड़कों से जुड़े हैं।