कोविड, युक्रेन युद्धामुळे जल जीवन मिशन मागे, प्रत्येक घरात नळ देण्याची योजना रखडली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 03:04 PM2023-08-02T15:04:27+5:302023-08-02T15:05:22+5:30

कोविड महामारी आणि युक्रेन युद्धामुळे स्टील आणि सिमेंटचा तुटवडा हे या योजनेच्या लक्ष्याच्या मागे राहण्याचे कारण सांगितले जात आहे.

Covid-19, war in Ukraine put Jal Jeevan Mission behind, plans to provide taps to every household stalled | कोविड, युक्रेन युद्धामुळे जल जीवन मिशन मागे, प्रत्येक घरात नळ देण्याची योजना रखडली

कोविड, युक्रेन युद्धामुळे जल जीवन मिशन मागे, प्रत्येक घरात नळ देण्याची योजना रखडली

googlenewsNext

संजय शर्मा -

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ‘जल जीवन मिशन’ या प्रमुख योजनेंतर्गत ‘हर घर नल’ योजना निर्धारित लक्ष्यापेक्षा मागे पडली आहे. मार्च २०२४ पर्यंत नळ कनेक्शन फक्त तीन-चतुर्थांश ग्रामीण भागात आणि देशातील अर्ध्या आदिवासी भागात उपलब्ध असतील.

कोविड महामारी आणि युक्रेन युद्धामुळे स्टील आणि सिमेंटचा तुटवडा हे या योजनेच्या लक्ष्याच्या मागे राहण्याचे कारण सांगितले जात आहे. २०१९ मध्ये जल जीवन मिशन सुरू करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक घरात नळ कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवले होते. जलशक्ती मंत्रालयानेही हे महत्त्वाचे लक्ष्य पूर्ण क्षमतेने गाठण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पश्चिम बंगाल आणि केरळसारख्या राज्यांमध्ये समस्या निर्माण झाल्या. या राज्य सरकारांनी पाण्याच्या टाक्या उभारण्याबाबत हात झटकले.२०२४पर्यंत जिथे देशातील सर्व घरांमध्ये नळ कनेक्शन उपलब्ध होणार होते तिथे आता ग्रामीण भागात केवळ ७५ टक्के लक्ष्य पूर्ण करणे अपेक्षित आहे. आदिवासी भागात हा आकडा कमी आहे आणि फक्त ५० टक्के आदिवासी भागातच नळ पोहोचू शकतो.

Web Title: Covid-19, war in Ukraine put Jal Jeevan Mission behind, plans to provide taps to every household stalled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.