शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

Corona Virus : बापरे! कोरोना लसीचे 2 डोस घेतले किंवा 3 तरीही नव्या व्हेरिएंटचा संसर्ग; 'या' लोकांना जास्त धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 19:21 IST

Corona Virus : कोरोना लसीचा बूस्टर डोस घेतलेल्या लोकांनाही संसर्ग होत आहे.

भारतात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. Omicron चे नवीन सब व्हेरिएंट भारतातील वाढत्या कोरोना प्रकरणांचसाठी जबाबदरा आहे. ज्याची 60 टक्क्यांहून अधिक प्रकरणे आहेत. भारत सरकारने स्थापन केलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळांची एजन्सीनुसार, Omicron चे subvariant XBB.1.16 भारतात कोविड-19 प्रकरणांच्या संख्येत सातत्याने वाढ होण्यामागे आहे. दुसर्‍या अहवालानुसार, भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम प्रयोगशाळेच्या सदस्याने म्हटले आहे की देशातील 25 ते 30 टक्के प्रकरणे XBB व्हेरिएंट आणि फक्त त्याच्या सब-व्हेरिएंटची आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 27 फेब्रुवारी 2023 ते 26 मार्च 2023 या कालावधीत देशातील कोविडच्या वाढत्या प्रकरणांवर म्हटले आहे की, Omicron प्रकाराचे नवीन सबव्हेरिएंट XBB.1.16 भारतातील वाढत्या कोरोनाच्या मागे आहे. SARS Cove-2 Genomics Consortium चे सदस्य म्हणाले, गेल्या दोन आठवड्यांत देशभरातील सांडपाण्याच्या नवीन नमुन्यांवरून असे दिसून आले आहे की कोरोनामुळे मृत्यू आणि हॉस्पिटलायझेशनच्या मागे ओमायक्रॉनचे सबव्हेरिएंट XBB.1.16 आहे आणि ते अशा लोकांमध्ये आढळते जे लोक आधीच कुठल्यातरी आजाराने ग्रस्त आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. 

लसीचा बूस्टर डोस घेतलेल्या लोकांनाही संसर्ग होत आहे. व्हायरसच्या गांभीर्याबद्दल बोलताना सदस्य म्हणाले, 'लोकांनी दोन किंवा तीन डोस घेतले याने काही फरक पडत नाही. हा प्रकार लसीकरण केलेल्या लोकांना देखील संक्रमित करू शकतो. पण या प्रकाराची चांगली गोष्ट म्हणजे या प्रकाराची तीव्रता वाढलेली नाही. परंतु हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की हा प्रकार देशातील अनेक राज्यांमध्ये पसरला आहे, यावरून हे दिसून येते की हा व्हायरस सक्रिय आहे आणि सर्वत्र पसरला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

XBB 1.16 ची लक्षणं

देशात वेगाने पसरत असलेल्या XBB 1.16 प्रकाराबाबत कोणतीही वेगळी लक्षणे समोर आली आहेत. थकवा, घसा खवखवणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे, नाक वाहणे आणि खोकला इत्यादी कोरोनाच्या जुन्या प्रकाराची लक्षणे देखील XBB 1.16 प्रकाराची लक्षणे असू शकतात. याशिवाय काही लोकांना ओटीपोटात दुखणे, अस्वस्थता आणि जुलाबाचीही तक्रार असू शकते.

या लोकांना जास्त धोका 

ICMR COVID-19 नॅशनल टास्क फोर्स/जॉइंट मॉनिटरिंग ग्रुपने जारी केलेल्या यादीनुसार, 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक, ज्यांना हृदयविकार आणि कोरोनरी धमनी रोग, मधुमेह, कमी इम्युनिटी, एचआयव्ही पॉझिटिव्ह, फुफ्फुस, किडनीचे आजार, लठ्ठपणा आणि ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना कोरोनाचा धोका सर्वात जास्त असतो.

अशी घ्या काळजी

जर कोणाला लक्षणे दिसली तर प्रथम स्वतःला वेगळे करा आणि नंतर कोरोना चाचणी करा. त्याचवेळी बदलत्या हवामानामुळे फ्लूच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे, ज्याची लक्षणे कोरोनासारखी आहेत. तुम्हाला सामान्य फ्लू असू शकतो. म्हणूनच तपासणी केल्याशिवाय आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लस