शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

Covid 3rd Wave: डॉक्टर म्हणाले ९८ दिवसांची असेल तिसरी लाट, आधीपेक्षा जास्त चिंताजनक स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 14:41 IST

Covid - 19 Third wave : आतापर्यंतचे अंदाज सांगत आहे की, यूकेमध्ये याची सुरूवात झाली आहे आणि भारतात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर तिसरी लाट कधीही येऊ शकते.

यूकेमध्ये कोरोनाच्या थर्ड वेव्हची म्हणजे तिसऱ्या लाटेची (Covid - 19 Third wave) सुरूवात झाली आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटचं (Delta Plus Variant) संक्रमण इथे वाढताना दिसत आहे. भारतात कोविडच्या दुसऱ्या लाटेत डेल्टा व्हेरिएंट सर्वात जास्त संक्रमणाचं कारण ठरला होता. त्यामुळे भारतातही तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. एक्सपर्ट सांगतात की, दुसरी लाट ही ११ दिवसांची होती आणि तिसरी लाट ९८ दिवसांची असेल. आतापर्यंतचे अंदाज सांगत आहे की, यूकेमध्ये याची सुरूवात झाली आहे आणि भारतात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर तिसरी लाट कधीही येऊ शकते.

कोविड एक्सपर्ट डॉ. अंशुमान कुमार म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट ११० दिवसांची होती. महाराष्ट्रात याचा प्रभाव कमी झाला त्यानंतर दिल्ली, यूपी, बिहार, बंगालमध्येही दुसरी लाट कमी झाली. हा व्हायरस नॅच्युरल नाहीये, हा एक बायोइंजिनिअर व्हायरस आहे. त्यामुळे यासाठी लावले जाणारे अंदाजही बरोबर ठरत आहे.

कुमार म्हणाले की, यूकेमध्ये तिसरी लाट सुरू होऊन १७ ते १८ दिवस झाली आहेत. त्यानंतर दीड-पावणे दोन महिन्यांनी भारतात नवीन लाट येईल. ही लाट ९८ दिवस राहील. ही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या आसपास सुरू होऊ शकते. ते म्हणाले की, चिंतेची बाब ही आहे की, नवा व्हेरिएंट डेल्टा आणि डेल्टा प्लस अजूनही पसरलेला आहे. (हे पण वाचा : धक्कादायक! मास्क लावून रनिंग करणं तरूणाला पडलं महाग, असं की ज्याचा कुणी विचारही केला नसेल!)

तिसऱ्या लाटेबाबत कोविड एम्सचे कोविड एक्सपर्ट डॉ. नीरज निश्चल म्हणाले की, तिसरी लाट दोन गोष्टींवर अवलंबून आहे. एका म्हणजे व्हायरसची बिहेविअर, जे आपल्या हातात नाही. दुसरी बाब म्हणजे मनुष्याचं बिहेविअर, जे आपल्या हातात आहे. ज्याप्रमाणे उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये पर्यटकांची गर्दी दिसत आहे. ही फार फार चिंतेची बाब आहे. यातून हे स्पष्ट दिसतं की, मनुष्यांचं बिहेविअर व्हायरसला पसरण्यासाठी म्यूटेड होण्यासाठी आणि नव्या व्हेरिएंटला वाढण्यासाठी संधी देणारं आहे. जर अशीच स्थिती राहिली तर तिसरी लाट जास्त घातक ठरेल.

डॉ. नीरज म्हणाले की, 'अजूनही देशभरातून ४० हजार नव्या केसेस समोर येत आहेत. हे व्हायरसचं संक्रमण आहे, जे केवळ दिल्लीमध्ये कंट्रोल केल्याने थांबणार नाही. इथेही अजूनही रोज १०० रूग्ण आढळत आहेत. सत्य हे आहे की, देशातील दुसरी लाट अजून संपलेली नाही'. ते इंग्लंडचे क्रिकेटर पॉझिटिव्ह आल्याचं सांगत म्हणाले की, 'जर बायो बबलमध्ये राहूनही हे लोक संक्रमित होऊ शकतात तर मनालीतील गर्दीत लोक संक्रमित कसे होणार नाहीत?'. (हे पण वाचा : Corona Vaccine : वॅक्सीन न घेणाऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, एक्सपर्ट्सनी दिला इशारा!)

तर कुमार म्हणाले की, तिसरी यावरही अवलंबून आहे की, येणाऱ्या एका महिन्यात किती वेगाने वॅक्सीनेशन होतं. जर वॅक्सीनेशन वेगाने केलं गेलं तर तिसरी लाट बऱ्याच प्रमाणात कंट्रोल करता येईल. इतकंच नाही तर डॉक्टर म्हणाले की, आतापर्यंत अनेक रिसर्चमध्ये बघण्यात आलं की, काही लोकांना वॅक्सीन घेतल्यावरही कोरोनाची लागण होत आहे. असे लोक संक्रमित झाले तर त्यांच्यावर प्रभाव कमी होईल.  पण त्यांच्या संपर्कात येणारे संक्रमित होतात. त्यांच्यात म्यूटेशनचा धोकाही असतो. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य