शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

देश नार्को दहशतवादाला तोंड देत आहे  : अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 10:39 IST

Amit Shah : आम्ही भारताला नार्कोटिक्सचा अड्डा बनू देणार नाही, अमित शाह यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देआम्ही भारताला नार्कोटिक्सचा अड्डा बनू देणार नाही, अमित शाह यांचं वक्तव्य.

गांधीनगर : देश नार्को दहशतवादाला तोंड देत असल्यामुळे त्याला निपटून काढण्यासाठी आम्हाला त्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी म्हटले.  नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटीत सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर रिसर्च अँड ॲनालिसिस ऑफ ड्रग्स अँड सायकोट्रॉफिक सबस्टेन्सेजचे उद्घाटन करताना ते बोलत होते. 

अमित शाह म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा केंद्रात दुसऱ्यांदा सरकार बनले तेव्हा या सेंटरला गुजरात फॉरेन्सिक युनिव्हर्सिटीशी जोडले जावे, असा निर्णय घेतला गेला होता. मला खात्री आहे की, हे विद्यापीठ दुसऱ्या राज्यांतही विस्तार करील आणि युवकांना फॉरेन्सिक सायन्समध्ये आपले योगदान देण्याची संधी मिळेल. आम्ही सायबर डिफेन्स आणि बैरिॲट्रिक रिसर्चबाबत सतत स्वावलंबी होत आहोत’, असे शाह म्हणाले. 

नार्कोटिक्सचा अड्डा बनू देणार नाहीदेश आज नार्को दहशतवादाला तोंड देत आहे, असे सांगून शाह म्हणाले की, केंद्र सरकारचा निर्णय हा देशात नार्कोटिक्स येऊ न देण्याचा आहे. आम्ही भारताला नार्कोटिक्सचा अड्डा बनू देणार नाही. अमित शाह यांनी अशा प्रकरणांच्या तपासासाठी वैज्ञानिक उपकरणांच्या वापराची गरज असल्याचे सांगितले. हा काळ थर्ड डिग्रीचा नाही. आम्हाला क्रिमिनल जस्टिस सिस्टिमला संघटित करावे लागेल. अशा कामात फॉरेन्सिक सायन्स महत्त्वाची भूमिका पार पाडेल. कोणत्याही प्रकरणात आमचा तपास हा जास्तीत जास्त वैज्ञानिक पुराव्यांवर आधारलेला असला पाहिजे, असे शाह म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शहाIndiaभारतBJPभाजपाHome Ministryगृह मंत्रालय