Counterfeit currency infringement will not stop | देशभरातील बनावट नोटांचा उपद्रव थांबता थांबेना
देशभरातील बनावट नोटांचा उपद्रव थांबता थांबेना

- नितीन अग्रवाल 

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतरही सरकार बनावट चलनी नोटांचा उपद्रव पूर्णपणे बंद करू शकले नाही. गृह मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाकडील (एनसीआरबी) माहितीनुसार २०१७ मध्ये देशभर असलेल्या बनावट नोटांपैकी २८.१० कोटी रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या गेल्या. २०१६ च्या तुलनेत या नोटा ४.५ कोटींपेक्षा जास्त होत्या.

एनसीआरबीच्या सोमवारी झालेल्या अहवालात म्हटले आहे की, २०१७ मध्ये एकूण ३५५९९४ बनावट नोटा पकडल्या गेल्या. एकूण ९७८ गुन्हे नोंद झाले व त्यात १०४६ लोकांना आरोपी बनवले गेले. पकडल्या गेलेल्या एकूण नोटांत ७४८९८ नोटा २००० आणि १००० रूपयाच्या ६५७३१ होत्या. याशिवाय ५०० च्या८८७९२०० रूपयांच्या ८३५ आणि १०० रूपयांच्या ९२७७८ बनावट नोटा पकडल्या गेल्या. जप्त झालेल्या नोटांमध्ये चलनातून बाद झालेल्या ५०० रूपयांच्या १०२८१५ नोटाही होत्या.

सर्वाधिक नोटा पकडल्या गुजरातमध्ये

सगळ्यात जास्त ९०,०८, ८८५० रूपयांच्या बनावट नोटा गुजरात राज्यात पकडल्या गेल्या. त्यानंतर उत्तर प्रदेशातून २८,६४,९८६० कोटी आणि पश्चिम बंगालमधून १९३६६०७० कोटी रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या गेल्या. महाराष्ट्रात एकूण ९०६४ बनावट नोटा पकडल्या गेल्या. त्यांचे मूल्य ५२३९६५० रूपये होते. राज्यात ७५ गुन्हे दाखल झाले व ६२ जण आरोपी बनवले गेले.

सरकारने संसदेत २०१६ मध्ये २४.६१ कोटी रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्याचे गेल्या काही दिवसांपूर्वी सांगितले होते. २०१७ मध्ये पकडल्या गेलेल्या २८.१० कोटी रूपयांच्या तुलनेत या नोटा ४.५ कोटी रूपये कमी मूल्यांच्या होत्या.


Web Title: Counterfeit currency infringement will not stop
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.