Cough Syrup : "पप्पा, हॉस्पिटलवाले सोडत नाहीत, पोलिसांना बोलवा...", कफ सिरपमुळे मृत्यू, शेवटची इच्छा अपूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 11:08 IST2025-10-20T11:04:12+5:302025-10-20T11:08:17+5:30
Cough Syrup : छिंदवाडातील उमरेठ येथील हेतांश सोनीचाही कफ सिरपमुळे मृत्यू झाला. हेतांशची शेवटची इच्छा देखील पूर्ण होऊ शकली नाही.

फोटो - nbt
कफ सिरपमुळे अनेक लहान मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान छिंदवाडातील उमरेठ येथील हेतांश सोनीचाही कफ सिरपमुळे मृत्यू झाला. हेतांशची शेवटची इच्छा देखील पूर्ण होऊ शकली नाही. त्याच्या वाढदिवसाच्या ११ दिवस आधीच त्याला मृत्यूने गाठलं. त्याला वाढदिवसाला गिफ्ट म्हणून सायकल हवी होती. वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या मोठ्या भावाने एक छोटी प्लास्टिकची सायकल खरेदी केली आणि ती त्याच्या फोटोसमोर ठेवली.
हेतांशचे वडील अमित कुमार सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "माझ्या मुलाला एकटं राहण्याची खूप भीती वाटत होती. त्याला नेहमीच त्याच्यासोबत कोणीतरी हवं होतं. हॉस्पिटलमध्ये त्याच्यासोबत नेहमीच कोणीतरी असायचं. जेव्हा हेतांश आयसीयूमध्ये असायचा तेव्हा त्याची आई रात्रभर त्याच्यासोबत बसायची. तो खूप बोलायचा. नर्सेस काळजीत पडायच्या. माझ्या मम्मीला फोन करा, माझ्या पप्पांना फोन करा असं सांगायचा. त्याला कशाचीही भीती वाटत नव्हती."
मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
"मुलाच्या मृत्यूला कोण जबाबदार?"
"एके दिवशी, तो मला म्हणाला, हे लोक (रुग्णालयातील कर्मचारी) मला सोडत नाहीत. पप्पा, तुम्ही पोलिसांना बोलवा, मग ते आपल्याला जाऊ देतील. मम्मी, पप्पा, मला घरी घेऊन जा." हितांशच्या आईने सांगितलं की, "हे सर्व कफ सिरपमुळे आहे. जर मी माझ्या हेतांशला कफ सिरप दिलं नसतं तर माझा मुलगा अजूनही जिवंत असता." डॉक्टर, सरकार, प्रशासन, कफ सिरप कंपनी... मुलाच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? असा सवाल देखील विचारला आहे.
"पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
"ते औषध नव्हतं, विष होतं, मी स्वत: माझ्या मुलाला..."; लेकाच्या मृत्यूनंतर आईचा टाहो
"हेतांशच्या उपचारावर खूप पैसे खर्च केले"
हेतांशचे वडील म्हणतात, "मी खरं सांगतोय, साहेब. मी हेतांशच्या उपचारावर खूप पैसे खर्च केले, कोणतीही कसर सोडली नाही. माझी एकच इच्छा होती की माझा मुलगा कोणत्याही प्रकारे बरा व्हावा. तो बरा झाल्यानंतरच त्याला घरी घेऊन जाऊ. पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं. त्याच्या मृत्यूनंतर आम्हाला कळलं नाही की कफ सिरपमुळे हे झालं आहे. जर सरकार सतर्क असतं तर इतक्या मुलांचा मृत्यू झाला नसता." नवभारत टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.