Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 11:40 IST2025-10-07T11:39:18+5:302025-10-07T11:40:35+5:30
Cough Syrup : मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे विषारी कफ सिरप प्यायल्याने चौदा मुलांचा मृत्यू झाला.

फोटो - आजतक
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे विषारी कफ सिरप प्यायल्याने चौदा मुलांचा मृत्यू झाला. बैतुलमध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला. यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांच्या घरातील आनंदच निघून गेला आहे. चार वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना डेक्स्ट्रोमेथोर्फन हायड्रोब्रोमाइड नावाचं सिरप दिलं जातं. ही औषधे सहसा पावडर स्वरूपात असतात, म्हणून त्यांना विरघळवण्यासाठी सॉल्व्हेंटची आवश्यकता असते. लहान मुलं कडू औषधे पित नाहीत, म्हणून गोड पदार्थ सॉर्बिटॉल किंवा ग्लिसरीन, ग्लिसरॉल किंवा प्रोपीलीन ग्लायकॉल त्यात मिसळलं जातं.
जेव्हा सॉल्व्हेंटऐवजी EG (इथिलीन ग्लायकॉल) किंवा DEG (डाय-इथिलीन ग्लायकॉल) वापरलं जातं तेव्हा ते मुलांसाठी विषारी बनते. EG आणि DEG हे रंगहीन आणि गंधहीन अल्कोहोल आहेत जे पेंट्स, हायड्रॉलिक ब्रेक फ्लुइड, शाई, बॉलपॉइंट पेन आणि इतरांमध्ये इंडस्ट्री केमिकल्स म्हणून वापरले जातात. WHO मानकांनुसार, औषधांमध्ये EG किंवा DEG चा वापर ०.१% पेक्षा जास्त नसावा.
"लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
EG किंवा DEG चे जास्त प्रमाण विषारी मानले जाते. जेव्हा EG किंवा DEG शरीरात प्रवेश करते तेव्हा ते टॉक्सिक मेटाबोलाइट्स म्हणजे विषारी केमिकल्स तयार करतात. उदाहरणार्थ, EG ऑक्सॅलिक एसिड तयार करते आणि DEG HEAA नावाचं एसिड तयार करतं. ही केमिकल्स किडनी आणि मज्जासंस्थेला नुकसान करतात. शिवाय, ही केमिकल्स रक्तातील ऑक्सिजनचा प्रवाह रोखतात, ज्यामुळे पेशी मरतात.
"कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
मध्य प्रदेशात मुलांचा मृत्यू करणाऱ्या विषारी कफ सिरपच्या उत्पादक श्रीसन फार्मास्युटिकल्सबाबत, तामिळनाडू सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. कफ सिरपमध्ये वापरले जाणारे प्रोपीलीन ग्लायकॉल हे फार्मास्युटिकल-ग्रेड नव्हते, तर इंडस्ट्रियल ग्रेड होतं, जे औषध निर्मितीमध्ये बॅन आहे असं म्हटलं. इंडस्ट्रियल-ग्रेड प्रोपीलीन ग्लायकॉल स्वस्त आहे, परंतु त्यात विषारी केमिकल्स आहेत जी मुलांसाठी घातक ठरू शकतात.