Cough Syrup : "लेकाच्या उपचारासाठी रिक्षा विकली, डायलिसिससाठी नव्हते पैसे, ३ लाखांचा खर्च"; वडिलांचा टाहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:51 IST2025-10-06T12:51:09+5:302025-10-06T12:51:46+5:30
Cough Syrup : मुलाच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला.

फोटो - आजतक
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मुलाचा मृत्यू झाला आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या चिमुकल्यांना वाचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावले ते आता उद्ध्वस्त झाले आहेत आणि दोषींवर त्वरित कारवाईची मागणी करत आहेत. ३ वर्षांच्या ११ महिन्यांच्या उसैदचे वडील यासीन हे रिक्षाचालक आहेत. यासीन यांनी ढसाढसा रडत सांगितलं की, मुलाच्या उपचारासाठी सुमारे ३.५ लाख रुपये खर्च आला. डायलिसिस करण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून त्यांना त्यांची रिक्षा विकावी लागली. पण तरीही ते मुलाला वाचवू शकले नाहीत.
उसैदच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यावेळी कोणीही त्यांना पोस्टमॉर्टेम करण्याचा सल्ला दिला नव्हता. उसैदवर पूर्वी डॉ. अमन सिद्दीकी उपचार करत होते, ज्यांनी कोल्ड्रिफ सिरप लिहून दिले होते. चार दिवसांनी १० ऑक्टोबरला उसैदचा वाढदिवस होता. त्यामळे घरात आनंदाचं वातावरण होतं. पण आता सर्वच संपलं आहे.
"कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
लोकांकडून पैसे उधार घेतले
५ वर्षांच्या अदनानचाही कफ सिरपमुळे मृत्यू झाला आहे. कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला आहे. परसिया ब्लॉकमध्ये ग्राहक सेवा केंद्र चालवणारे अमीन यांनी स्पष्ट केलं की ते आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी लोकांकडून पैसे उधार घेतले होते. त्यांच्या मुलाच्या उपचारासाठी ते नागपूरला असल्याने त्यांचं दुकान जवळजवळ एक महिना बंद होते.
कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
"मला वाचवा, मला घरी घेऊन जा"
अमीन म्हणाले की त्यांच्या मुलाने त्यांच्या आईला "मला वाचवा, मला घरी घेऊन जा" अशी विनंती केली होती. अदनानचे वडील अमीन आणि आजोबा मजीब यांनी दोषींची घरं पाडण्याची मागणी केली आहे. कफ सिरपमुळे आतापर्यंत अनेक लहान मुलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे आतापर्यंत ९ मुलांचा मृत्यू झाला आहे.