Coronvirus: Union Home Minister Amit Shah infected with coronavirus; Admitted in hospital | Coronvirus: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना कोरोनाची लागण; उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

Coronvirus: केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना कोरोनाची लागण; उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये केलं दाखल

नवी दिल्ली – देशात कोरोनाचं संकट कायम असताना आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत स्वत: अमित शहांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. कोरोनाच्या सुरुवाती लक्षण दिसल्यानंतर अमित शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आता अमित शहा राम मंदिर भूमीपूजनालाही उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे.

याबाबत अमित शहा म्हणाले की, माझी तब्येत ठीक आहे, परंतु डॉक्टर्सच्या सल्ल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील काही काळात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी तात्काळ स्वत:ला आयसोलेट करुन कोविड टेस्ट करावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.   

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronvirus: Union Home Minister Amit Shah infected with coronavirus; Admitted in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.