शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

coronavirus: कोरोनाच्या रुग्णांसोबत जनावरांपेक्षा वाईट व्यवहार, सुप्रीम कोर्टाने या राज्याला लगावली फटकार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 4:30 PM

एकीकडे आरोग्य कर्मचारी रुण्यांवर उपचारांसाठी प्रयत्न करत असले तरी काही ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांची हेळसांड होत असल्याच्या बातम्या येत आहेत.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकार लगावताना दिल्लीतील रुग्णालयांची अवस्था चिंताजनक असल्याचे सांगितले. कोरोना बाधितांच्या मृतदेहांची हेळसांड होत आहे, तर काही ठिकाणी मृतदेह कचऱ्यामध्ये सापडत आहेत. लोकांना जनावरांपेक्षा वाईट वागणूक दिली जात आहेसर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारकडून करण्यात येत असलेल्या कोरोनाच्या कमी चाचण्यांबाबतही नाराजी व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील बहुतांश भागात आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. एकीकडे आरोग्य कर्मचारी रुण्यांवर उपचारांसाठी प्रयत्न करत असले तरी काही ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांची हेळसांड होत असल्याच्या बातम्या येत आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्वतः या प्रकाराची दखल घेतली आहे. तसेच कोरोना बाधितांच्या मृतदेहांची हेळसांड होत आहे, तर काही ठिकाणी मृतदेह कचऱ्यामध्ये सापडत आहेत. लोकांना जनावरांपेक्षा वाईट वागणूक दिली जात आहे, असे मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम. आर. शाह यांच्या खंडपीठाकडे सोपवली आहे.दरम्यान, या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकार लगावताना दिल्लीतील रुग्णालयांची अवस्था चिंताजनक असल्याचे सांगितले. एमएचएच्या सूचनांचे पालन होताना दिसत नाही आहे. तसेच रुग्णालयांमध्ये मृतदेहांचीही योग्य व्यवस्था होत नाही आहे. काही प्रकरणात तर रुग्णांच्या नातेवाईकांना माहितीही दिली जात नाही आहे. काही प्रकरणात कुटुंबीयांना अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होता येत नाही आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.एका वृत्ताचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, एका सरकारी रुग्णालयात लॉबी आणि वेटींग एरियामध्ये मृतदेह पडलेले होते. तर वॉर्डमधील बहुतांश बेड रिकामे होते. तिथे अॉक्सिजन सलाईन ड्रिपची व्यवस्था नव्हती. असे बेड मोठ्या प्रमाणात रिकामे दिसत आहेत. तर दुसरीकडे रुग्ण भटकत फिरत आहेत.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी केंद्र सरकारलाही नोटीस बजावली आहे. तसेच दिल्लीसोबत महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारकडून करण्यात येत असलेल्या कोरोनाच्या कमी चाचण्यांबाबतही नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीत मुंबई आणि चेन्नईच्या तुलनेत रुग्ण वाढले आहेत. मात्र चाचण्यांचे प्रमाण दर दिवशी सात हजार ते पाच हजार एवढे कमी का करण्यात आले, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप

जबरदस्त! LOCवर कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराचा दणका, १० चौक्या केल्या उद्ध्वस्त

अमेरिकेने चीनमध्ये पसरवले एलियन व्हायरस, होताहेत गंभीर परिणाम, चीनचा आरोप

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

coronavirus: चौफेर टीकेनंतर चीनने श्वेतपत्रिका काढली, कोरोना कधी, कसा, कुठे पसरला सगळी माहिती दिली 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकार