CoronaVirus: World Bank Approves 1 Billion Dollar Emergency Help For India To Fight Corona rkp | CoronaVirus : कोरोनावर मात करण्यासाठी वर्ल्ड बँकेकडून भारताला एक अब्ज डॉलर मंजूर

CoronaVirus : कोरोनावर मात करण्यासाठी वर्ल्ड बँकेकडून भारताला एक अब्ज डॉलर मंजूर

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी वर्ल्ड बँकेनेभारताला एक अब्ज डॉलरच्या आपत्कालीन अर्थ सहाय्यता निधीसाठी मंजुरी दिली आहे. वर्ल्ड बँकेच्या सहाय्यता योजनेतून १.९ अब्ज डॉलरच्या पहिल्या टप्प्यात २५ देशांची मदत केली जाणार आहे. तसेच, ४० हून अधिक देशांमध्ये नवीन उपक्रम वेगाने आखले जात आहेत.

वर्ल्ड बँकेकडून आपत्कालीन अर्थ सहाय्यता निधीतून सर्वाधिक निधी भारताला दिला जाणार आहे. जो एक अब्ज डॉलर असणार आहे. वर्ल्ड बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाने जगभरातील विकसनशील देशांसाठी आपत्कालीन सहाय्यता योजनेच्या पहिल्या टप्प्यात मंजुरी दिली. त्यानंतर वर्ल्ड बँकेने सांगितले की, "भारतात एक अब्ज डॉलरच्या आपत्कालीन अर्थ सहाय्यता निधीतून कोरोनावर मात करण्यासाठी चांगले स्क्रीनिंग, कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे, वैद्यकीय तपासणी प्रयोगशाळा, व्यक्तीगत सुरक्षा उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत मिळेल."

दक्षिण आशियात वर्ल्ड बँकेने पाकिस्तानसाठी २० कोटी डॉलर, अफगानिस्तानसाठी १० कोटी डॉलर, मालदीवसाठी ७३ लाख डॉलर आणि श्रीलंकेसाठी १२. ८६ कोटी डॉलरची सहाय्यता करण्यास मंजुरी दिली आहे. याचबरोबर, वर्ल्ड बँकेने म्हटले आहे की, जगभरातील कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी १५ महिन्यांच्या दृष्टीने १६० अब्ज डॉलरच्या आपत्कालीन सहाय्यता निधीच्या योजनेला मंजुरी दिली आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. भारतात सुद्धा दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत भारतात २ हजार ५५३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर ७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 

Web Title: CoronaVirus: World Bank Approves 1 Billion Dollar Emergency Help For India To Fight Corona rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.