शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

Coronavirus: भारतातून कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे कधी ओसरणार? केंब्रिज विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी सांगितली नेमकी तारीख 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 5:38 PM

Coronavirus in India : देशातील दैनंदिन रुग्णवाढ घटू लागली असतानाच केंब्रिज जज बिझनेस स्कूल आणि नॅशनल इंस्टिट्युट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल रिसर्चने अजून एक दिलासादायक माहिती दिली आहे.

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशात थैमान घातले आहे. मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. (Coronavirus in India) दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येत किंचीत घट झाल्याचे दिसल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. यादरम्यान आता केंब्रिज जज बिझनेस स्कूल आणि नॅशनल इंस्टिट्युट ऑफ इकॉनॉमिक अँड सोशल रिसर्चने अजून एक दिलासादायक माहिती दिली आहे. भारतामध्ये कोरोनाचा पीक येऊन गेला असून, आता नव्या रुग्णांचे प्रमाण घटत जाईल, असे सांगितले. या दोन्ही संस्थ्या केंब्रिज विद्यापीठाचा भाग आहेत. ( When will the second wave of coronavirus completely disappear from India? Cambridge University experts say the exact date) 

मात्र तज्ज्ञांनी हेही सांगितले की, आता देशातील विविध राज्यांमधील कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या प्रमाणात तफावत आहे. काही राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तर आसाम, हिमाचल प्रदेश, तामिळनाडू आणि त्रिपुरा यासारख्या राज्यात पुढच्या दोन आठवड्यांमध्ये साथीचा पीक येऊ शकतो. 

यादरम्यान, संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ शाहिद जमील यांनी सांगितले की, सध्यातरी कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरायला काही महिन्यांचा अवधी लागू शकतो. साधारणपणे जुलै महिन्याच्या अखेरीस भारताता आलेली कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरेल.  दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, देशातील नऊ राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दिल्ली या कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांचाही समावेश आहे. मात्र सध्या देशातील कोरोना रुग्णांची संख्या घटत असली तरी दुसऱ्या लाटेची अखेर होण्यास काही महिन्यांचा अवधी लागेल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रचंड प्रकोपासाठी कोरोना विषाणूचे नवे व्हेरिएंट्स कारणीभूत असू शकतात. मात्र हे व्हेरिएंट्स अधिक धोकादायक असल्याचे कुठलेही संकेत मिळालेले नाहीत. मात्र भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधील रुग्ण हे सर्वसामान्यपणे दुसऱ्या वा तिसऱ्या लाटेत ज्याप्रमाणे कमी होतात त्या वेगाने कमी होणार नाहीत, अशी शक्यताही शाहीद जमील यांनी वर्तवली. 

भारतात आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये देशात एका दिवसांतील सर्वाच्च रुग्णसंख्या ही ९६-९७ हजार एवढी नोंदवली गेली होती. मात्र दुसऱ्या लाटेमध्ये ती सुमारे चार लाखांवर पोहोचली आहे. त्यामुळे या लाटेला ओसरण्यासाठी वेळ लागेल. तसेच सध्या अशी काही राज्ये आहेत. जिथे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य