शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: १.६० लाख कोटींच्या योजना केव्हा पोहोचतील गरिबांपर्यंत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 07:10 IST

यातील प्रवासी मजुरांसाठी स्वस्त भाड्याची घरे बांधण्याची योजना सरकारी आणि खासगी क्षेत्रांच्या सहभागाने होणार आहे. टोल-रस्ते जसे बांधले जातात तशीच ही योजना आहे.

- सोपान पांढरीपांडे नागपूर : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोविड सवलत योजनेंतर्गत आज १.६० लाख कोटींचेदुसरे पॅकेज प्रवासी मजूर, आदिवासी, रस्त्यावरील फेरीवाले व शेतकऱ्यांसाठी जाहीर केले.पण या सवलती गरिबांपर्यंत केव्हा पोहोचतील, हा लाखमोलाचा प्रश्न आहे.आज जाहीर झालेल्या ९ सवलतींमध्ये प्रवासी मजुरांना दोन महिने मोफत अन्न पुरविण्यासाठी ३,५०० कोटी, मुद्रा शिशू कर्ज व्याज सवलतीसाठी १,५०० कोटी, पंतप्रधान आवास योजनेतील मध्यमवर्गीयांच्या घरासाठी अनुदान म्हणून ७० हजार कोटी, ५० लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी १० हजार, कर्जासाठी ५ हजार कोटी, आदिवासी रोजगारासाठी ६ हजार कोटी व शेतकऱ्यांना अतिरिक्त कर्जासाठी ३० हजार कोटी अशा एकूण १.६० लाख कोटींच्या सवलती आहेत.यातील प्रवासी मजुरांसाठी स्वस्त भाड्याची घरे बांधण्याची योजना सरकारी आणि खासगी क्षेत्रांच्या सहभागाने होणार आहे. टोल-रस्ते जसे बांधले जातात तशीच ही योजना आहे. या घरांसाठी सरकार व खासगी जमीन मालक केव्हा तयार होतील व ही घरे केव्हा तयार होतील, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या योजनेचे यश अधांतरी आहे.आजच्या पॅकेजमधील शेतकºयांना २.५० कोटी किसान क्रेडिट कार्ड, मुद्रा शिशू कर्ज, ७० हजार कोटींचे अतिरिक्त पीक कर्ज व आदिवासी रोजगारांसाठी ६ हजार कोटी, भारतभर एकच रेशनकार्ड चालणार, या स्वागतार्ह सवलती आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूण २० लाख कोटींच्या कोविड पॅकेजची घोषणा केली होती. त्यापैकी रिझर्व्ह बँकेने ५.७४ लाख कोटी व २४ मार्चच्या पॅकेजमध्ये अर्थमंत्र्यांनी १.७० लाख कोटी अशा ७.४४ लाख कोटींच्या सवलती जाहीर झाल्या होत्या. काल व आज मिळून अर्थमंत्र्यांनी ७.८० लाख कोटींच्या सवलती जाहीर केल्या आहेत. त्यामुळे आता केवळ ४.७६ लाख कोटींच्या सवलती जाहीर व्हायच्या आहेत.फेरीवाल्यांच्या १० हजार रुपये कर्जाबाबतही संशय व्यक्त व्हावा अशीच स्थिती आहे.आज फेरीवाल्यांच्या दुकानातील मालसाठाही २ ते ३ लाखांचा असतो. अशा स्थितीत १० हजार रुपये कर्जपुरवठा ही हास्यास्पद बाब आहे. त्याचा फेरीवाल्यांना फारसा फायदा नाही.प्रधानमंत्री आवास योजनेतील वार्षिक ६ ते १८ लाख रुपये उत्पन्न असणाºया मध्यमवर्गीयांना २.६७ लाख रुपये अनुदान मिळते. ही योजना ३१ मार्च २०२० वरून एक वर्षासाठी वाढविण्यात आली आहे. या योजनेचा फायदा २.५० लाख कुटुंबांना होईल, अशी सरकारला आशा आहे. परंतु लॉकडाऊन संपल्यानंतर एक वर्षात ही घरे पूर्ण होतील का, हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत