शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: एन-९५ मास्क कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी कुचकामी, आरोग्य मंत्रालयाने वापराबाबत दिला असा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 11:52 IST

घराबाहेर पडताना एन-९५ मास्कचा लोकांकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जात असून, त्यामुळे या मास्कची मागणीही वाढली आहे. मात्र आता या एन-९५ मास्कच्या वापराबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्दे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एन-९५ मास्क कोरोनाचा फैलाव रोखण्याच्याबाबतीत निरुपयोगी असल्याचे म्हटले आहेव्हॉल्व्ड रेस्पिरेटर लावलेला मास्क कोरोनाचा फैलाव रोखू शकत नाहीया मास्कमध्ये असलेल्या व्हॉल्व्ड रेस्पिरेटरच्या छिद्रामधून कोरोना विषाणू बाहेर येण्याची शक्यता वाढते

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा फैलाव वाढू लागल्यापासून कोरोनाला रोखण्यासाठीच्या विविध उपायांचा अवलंब सुरू झाला आहे. दरम्यान, वैद्यकीय क्षेत्रात वापरला जाणारा एन-९५ मास्क कोरोनाविरोधातील प्रभावी हत्यार म्हणून सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झाले आहे. घराबाहेर पडताना एन-९५ मास्कचा लोकांकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जात असून, त्यामुळे या मास्कची मागणीही वाढली आहे. मात्र आता या एन-९५ मास्कच्या वापराबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा मास्क कोरोनाचा फैलाव रोखण्याच्याबाबतीत निरुपयोगी असल्याचे म्हटले आहे. तसेच याबाबत विविध राज्ये आणि केंद्रशासित राज्यांना पत्र लिहून वापराबाबत सूचना केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य सेवा विभागाचे महासंचालक राजीव गर्ग यांनी याबाबतचे पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माधयमातून  व्हॉल्व्ड रेस्पिरेटर लावलेल्या मास्कबाबत इशारा देण्यात आला आहे. अशा प्रकारचा मास्क कोरोनाचा फैलाव रोखू शकत नाही. तसेच ही बाब कोविड-१९ ला रोखण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांच्या विपरित आहे, असे या पत्रात म्हटले आहे.  

 एन-९५ मास्कचा वापर आरोग्य कर्मचाऱ्यांऐवजी सामान्य लोकांकडून करण्यात येत आहे. तसेच या मास्कचा वापर हा चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. विशेषकरून असे एन-९५ मास्क वापरले जात आहेत जे छिद्रयुक्त आहेत. त्यांच्यामध्ये व्हॉल्व्ड रेस्पिरेटर बसवलेला आहे.

अशा प्रकारचे छिद्रयुक्त मास्क कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या अगदी विरुद्ध आहेत. कारण या छिद्रातून कोरोना विषाणू बाहेर येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मी आग्रह करतो की, राज्यांनी फेस आणि माऊथ कव्हरच्या वापराचे पालन करण्याबाबत आदेश द्यावेत, तसेच एन-९५ मास्कच्या चुकीच्या वापराला थांबवावे, अशी सूचना गर्ग यांनी केली आहे. 

 दरम्यान, नाक आणि तोंडाच्या माध्यमातून होऊ शकणाऱ्या कोरोनाच्या संसर्गामुळे सरकारने एप्रिल महिन्यात काही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यानुसार चेहरा आणि तोंड झाकण्यासाठी सुती कपड्यापासून तयार केलेल्या प्रोटेक्टिव्ह कव्हरचा वापर करण्याबाबतचा सल्ला देण्यात आला होता. तसेच गरम पाण्यात मीठ टाकून स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्या पुनर्वापरास हरकत नसल्याचेही सांगण्यात आले होते.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल

भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यMedicalवैद्यकीय