शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

सरकार आणि सर्वसामान्यांन्याना एवढ्या किमतीत मिळणार कोरोनावरील लस, अदर पूनावाला यांची मोठी घोषणा

By बाळकृष्ण परब | Updated: January 3, 2021 18:08 IST

Corona Vaccine Update : कोविशिल्ड या लसीचे उत्पादन होत असलेल्या सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदार पूनावाला यांनी कोरोनाच्या लसीच्या किमतीबाबत मोठी घोषणा केली आहे.

ठळक मुद्देसीरम इन्स्टिट्युटमध्ये तयार होत असलेली ऑक्सफर्डची कोरोनावरील लस सरकारला २०० रुपयांमध्ये दिली जाईलसर्वसामान्य जनतेला ही लस एक हजार रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली जाईलपुण्यातील सीरम इन्स्टिस्ट्यूटमध्ये ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका यांनी तयार केलेल्या कोविशिल्ड या लसीचे उत्पादन सुरू आहे

नवी दिल्ली - नव्या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनावरील लसींना मान्यता मिळाल्याने कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीच्या छायेत वर्षभर जगत असलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र कोरोनावरील लस ही मोफत मिळणार की विकत घ्यावी लागले आणि विकत घेतली तर तिची किंमत असेल असे प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. दरम्यान, कोविशिल्ड या लसीचे उत्पादन होत असलेल्या सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदार पूनावाला यांनी कोरोनाच्या लसीच्या किमतीबाबत मोठी घोषणा केली आहे.अदार पूनावाला यांनी कोरोनाच्या लसीच्या किमतीबाबत माहिती देताना सांगितले की, सीरम इन्स्टिट्युटमध्ये तयार होत असलेली ऑक्सफर्डची कोरोनावरील लस सरकारला २०० रुपयांमध्ये दिली जाईल. तर सर्वसामान्य जनतेला ही लस एक हजार रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. पुण्यातील सीरम इन्स्टिस्ट्यूटमध्ये ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका यांनी तयार केलेल्या कोविशिल्ड या लसीचे उत्पादन सुरू आहे.दरम्यान, डीसीजीआयचे संचालक व्ही.जी. सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी ट्वीट करत आपला आनंद व्यक्त केला. "नव्या वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. लस संकलनासाठी सीरम इन्स्टिट्यूटनं पत्करलेल्या सर्व जोखीमांनांतर अखेर यश मिळालं. करोनावर मात करणारी कोविशिल्ड ही पहिली लस असून तिच्या वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असून पुढील  आठवड्यापासून ती देण्यास तयार आहे," असं ट्वीट अदर पुनावाला यांनी केलं. या ट्वीटसोबतच अदर पुनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, बिल गेट्स, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर, ऑक्सफर्डसह अनेकांचे आभार मानले.शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (उऊरउड)च्या कोरोनावरच्या तज्ज्ञ समितीने मान्यता दिली होती. त्यानंतर आता डीसीजीआयकडून परवानगी मिळाली आहे. सोबतच कॅडीलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे. सीरम आणि भारत बायोटेकच्या या दोन्ही लसी २ ते ८ डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवण्यात येऊ शकतात, असे डीसीजीआयनं म्हटलं आहे. तसेच, थोडा ताप, वेदना आणि अलर्जी असे परिणाम प्रत्येक लसींमध्ये असतात. या दोन्ही लसी ११० टक्के सुरक्षित आहेत, असं व्ही.जी. सोमाणी म्हणाले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसIndiaभारतHealthआरोग्य