शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVaccine : गुड न्यूज! देशातील पहिल्या स्वदेशी लशीच्या अखेरच्या परीक्षणाला आजपासून होणार सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 13:55 IST

सध्या देशात, भारत बायोटेक-ICMR च्या कोव्हॅक्सिन (Covaxin), झायडस कॅडिलाची झायकोव्ह-डी (Zykov-D) आणि ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाची कोविशील्‍ड (Covishield) या तीन लशी परीक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. भारतात कोविशिल्डचे तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण सीरम इंडियाद्वारे केले जाणार आहे.

ठळक मुद्देदेशातील पहिली स्वदेशी कोरोना लस कोव्हॅक्सिनच्या मानवी परीक्षणाला सुरुवात केली आहे.अहमदाबाद येथील फार्मास्युटिकल कंपनी झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह-डीचेही मानवी परीक्षण सुरू आहे.पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया कोविशील्डचे भारतात परीक्षण सुरू करणार आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढत होत आहे. यातच एक चांगली बातमी आली आहे. देशात आजपासून पहिल्या स्वदेशी लशीच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यावरील परीक्षणाला सुरुवात करण्यात येणार आहे. यासंदर्भात मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) एका पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

यावेळी आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल आणि आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव उपस्थित होते. यावेळी देशातील कोरना व्हायरसवरील लशींसंदर्भात माहिती देण्यात आली.

यावेळी नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर पॉल यांनी सांगितले, की सध्या तीन कोरोना लशींवर काम सुरू आहे. या सर्व लशी, परीक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. यावेळी त्यांनी माहिती दिली होती, की या तीन लशींपैकी एका लशीचे तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण आज-उद्या सुरू करण्यात येईल. मात्र, त्यांनी या लशीच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. तसेच इतर दोन लशी प्रत्येकी परीक्षणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावर आहेत.

सध्या देशात, भारत बायोटेक-ICMR च्या कोव्हॅक्सिन (Covaxin), झायडस कॅडिलाची झायकोव्ह-डी (Zykov-D) आणि ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाची कोविशील्‍ड (Covishield) या तीन लशी परीक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. भारतात कोविशिल्डचे तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण सीरम इंडियाद्वारे केले जाणार आहे.

पहिली लस 'कोव्हॅक्सिन' - हैदराबाद येथील भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सोबतीने, देशातील पहिली स्वदेशी कोरोना लस कोव्हॅक्सिनच्या मानवी परीक्षणाला सुरुवात केली आहे.

दुसरी लस - 'झायकोव्ह-डी' -अहमदाबाद येथील फार्मास्युटिकल कंपनी झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह-डीचेही मानवी परीक्षण सुरू आहे. पुढील वर्षापर्यंत लस लॉन्च होऊ शकते असे कंपनीने म्हटले आहे.

तिसरी लस - 'कोविशील्ड'पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड युनिवर्सिटी आणि एस्ट्रा जेनेकाने विकसित केलेल्या लशीचे भारतात परीक्षण सुरू करण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाची परवानगी घेतली आहे. कोविशील्ड(Covishield) असे या लसीचे नाव आहे.

तत्पूर्वी, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लाल किल्ल्यावरून भारतात तीन लशींवर काम सुरू आहे, अशी माहिती दिली होती.  

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लडाखवरून सुनावलं; आता अशी आली चीनची प्रतिक्रिया

CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmedicineऔषधंPuneपुणेdelhiदिल्लीahmedabadअहमदाबाद