शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

CoronaVirus : उत्तर प्रदेश सरकार अपयशी,  आमदार, मंत्रीच करू लागले टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 6:14 AM

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या जवळपास एक डझनपेक्षा अधिक आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या भागातील अव्यवस्थेबाबत माहिती दिली आहे.

शीलेश शर्मा-

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा ढासळली असून, अधिकारी ऐकत नाहीत, अशी टीका सरकारमधीलच मंत्री बृजेश पाठक यांनी आहे. उत्तर प्रदेशातील ढासळलेल्या परिस्थितीचा अंदाज यावरूनच येऊ शकतो. विशेष म्हणजे यापूर्वी बृजेश पाठक यांनी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवत नाराजी व्यक्त केली होती. बृजेश पाठक हे असे एकटे नेते नाहीत ज्यांनी राज्य सरकारच्या एकूणच कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांनी तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून ते सार्वजनिकही केले होते. यात त्यांनी आरोप केला होता की, बरेलीतील आरोग्य व्यवस्था ढासळली आहे. अधिकारी आणि डॉक्टर फोन घेत नाहीत. रुग्णांना बेड मिळत नाही, औषधी मिळत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या जवळपास एक डझनपेक्षा अधिक आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या भागातील अव्यवस्थेबाबत माहिती दिली आहे. भाजपच्या एका आमदारांनी तर रडत रडत आपले गाऱ्हाणे मांडले की, आपण मंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांना विनंती केली. मात्र, उपचाराअभावी पत्नीने हॉस्पिटलबाहेर जीव सोडला.  नोएडात बहुतांश हॉस्पिटलमध्ये लसीची कमतरता आहे. हॉस्पिटलबाहेर १८ वर्षांवरील लोकांची रांग आहे. मात्र, मुख्यमंत्री असा दावा करत आहेत की, राज्यात लसीचा, व्हेंटिलेटरचा, ऑक्सिजनचा तुटवडा नाही. 

सत्ताधारी आमदार, मंत्रीच करू लागले टीका फिरोजाबादमधील भाजपचे आमदार मनीष असिजा हे सरकारी यंत्रणेमुळे इतके दु:खी आहेत की, जनतेच्या सेवेसाठी दिवसरात्र लोकांसाठी पैसा जमवून कोरोना सेंटर स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोजाबादमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये पीएम केअरमधून आलेले व्हेंटिलेटर अद्याप बॉक्समधून उघडलेही नाहीत. ते धूळखात पडून आहेत, तर दुसरीकडे रुग्ण ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पडत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस